शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या होर्डिंग्जनाही दणका

By admin | Updated: November 25, 2014 23:51 IST

महापालिकेची धडक मोहीम : उच्च न्यायालयाच्या निकालानंतर यंत्रणा हलली

कोल्हापूर : उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका तसेच महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा १९९५च्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिका हद्दीत अवैध जाहिरात फलक काढण्याची मोहीम आज, मंगळवारी महापालिकेने राबविली. शहरात दिवसभरात ३२ विनापरवानगी होर्डिंग्ज् हटविण्यात आली. शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर लावलेल्या जाहिरातीही या मोहिमेच्या तडाख्यातून सुटल्या नाहीत. खुद्द आमदारांच्याच जाहिरातींना मनपाने दणका दिल्याने इतर अवैध जाहिराती काढण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.कायद्यानुसार शहरामध्ये विनापरवानगी होर्डिंग्ज् किंवा जाहिराती लावता येत नाहीत. परंतु सध्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. त्यासाठी अनेकांनी महापालिकेकडून रितसर परवानगी घेतलेली नाही. अशी परवानगी न घेतलेले फलक हटविण्याची मोहीम दिवसभर सुरू होती. यामध्ये निंबाळकर माळ ते धैर्यप्रसाद हॉल, लाईन बझार चौक ते भगवा चौक ते पिंजार गल्ली, राजारामपुरी जनता बझार, साईक्स एक्स्टेंशन, टाकाळा या परिसरातील शुभेच्छा, अभिनंदन, श्रद्धांजली अशा आशयाचे ३२ अनाधिकृत डिजिटल फलक काढण्यात आले. शहरामध्ये कोणतेही डिजीटल फलक लावण्यासाठी महापालिकेच्या इस्टेट विभागाकडे जाहिरात परवाना देण्यासाठी सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यानुसार संबधितांनी रितसर शुल्क भरून परवाना प्राप्त करून घ्यावा. विनापरवाना डिजिटल फलक लावलेले आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा १९९५अंतर्गत तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने पत्रकाद्वारे कळविले आहे. (प्रतिनिधी)अवैध होर्डिंग्ज राजकीय पक्षांचीशहरातील अनधिकृत असलेली ९९ टक्के होर्डिंग्ज ही राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. नेत्याला खूश करण्यासाठी कार्यकर्त्यांनी लावलेली होर्डिंग्ज काढण्याचे धाडस यापूर्वी महापालिकेने दाखविले नव्हते. न्यायालयाच्या कारवाईच्या दणक्याने शहरात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेली अडीचशेहून अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचा सपाटा महापालिकेने लावला आहे.