शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कागल पालिकेचा थकबाकीदारांना दणका

By admin | Updated: May 11, 2016 00:54 IST

नोटिसा लागू : ९० दिवसांच्या आत घरफाळा, पाणी बिल न भरल्यास दरमहा दोन टक्के दराने व्याज आकारणी

जहांगीर शेख -- कागल --पाणीपट्टी-घरफाळा करांची बिल आकारणी करून संबंधित मिळकतधारकास नोटिसा पाठविलेल्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत त्यांनी ही रक्कम न भरल्यास त्या रकमेवर दरमहा दोन टक्के व्याज म्हणजे वार्षिक २४ टक्के व्याज आकारणी कागल नगरपरिषद करणार आहे. या महिनाअखेर सर्व मिळकतधारकांना अशा नोटिसा लागू केल्या जाणार आहेत.व्याज आकारणी करण्याबाबतची ही नियमावली महाराष्ट्र शासनाने २०१० मध्ये केली आहे. त्याला कायदेशीर मान्यता आहे. राज्यातील अनेक नगरपालिकांनी याची अंमलबजावणी यापूर्वी केली आहे. कागल नगरपरिषदेने सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल २०१६ पासून व्याज आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वर्ष-दोन वर्षे घरफाळा, पाणीपट्टी इतर करांची रक्कम थकवून नंतर भरली तरी व्याज देण्याचा विषय नव्हता. आज मात्र जर पाणीपट्टी, घरफाळा थकविला, तर दरमहा दोन टक्के रक्कम जादा द्यावी लागणार आहे. कागल शहरात आठ हजार तीनशे मिळकतधारक आहेत. तर पाच हजार सहाशे नळ कनेक्शनधारक आहेत. करआकारणी करताना घरफाळा हा ज्या परिसरात घर आहे त्यावरून प्रती चौरस फूट आकारला जातो. हा प्रती चौरस फूट दर ज्या त्या परिसरावरून दोन रुपये ते १५ रुपये असा आहे. त्यामुळे घरफाळा थकबाकी ठेवणे आता कागलकरांना परवडणार नाही. जर ९० दिवसांच्या आत ही रक्कम भरली, तर एक टक्के रकमेची सूटही मिळणार आहे. म्हणजे वेळेत रक्कम भरणाऱ्या लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. २०१५-२०१६ मध्ये ९३ टक्के इतकी वसुली झाली आहे. ७ टक्के वसुली झालेली नाही. त्यामध्ये हद्दवाढीस आलेल्या क्षेत्रातील मिळकतधारकांनी सोयी सुविधा नाही तर कर का भरायचा? असा पवित्रा घेतल्याने ही थकबाकी आहे. थकबाकीसाठी व्याज आकारणी करण्यासाठी मिळकतधारकांना नोटिसा देण्याचे काम मे महिनाअखेर सुरू होणार आहे. मीटर रीडिंगप्रमाणे पाणीपट्टीशहरातील सर्व चाव्यांना मीटर बसविली आहेत. आता एप्रिल मे महिन्याचे मीटर रीडिंग घेऊन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चावीधारकांना बिले दिली जाणार आहेत. ज्यांच्याकडे मीटर नाही किंवा परस्पर बंद केले आहे, त्यांना पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.