शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:26 IST

दत्तवाड : राजापूरवाडी (ता. शिरोळ) येथील आर. के. हायस्कूल परिसरामध्ये सुदर्शन सोलापुरे या व्यक्तीस जखमी घार निदर्शनास आली. ...

दत्तवाड : राजापूरवाडी (ता. शिरोळ) येथील आर. के. हायस्कूल परिसरामध्ये सुदर्शन सोलापुरे या व्यक्तीस जखमी घार निदर्शनास आली. त्याने तत्काळ राजापूरवाडीचे प्राणीमित्र वैभव गोते यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ त्या घारीला घरी नेऊन प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी वन्यजीव पशू पक्षी सामाजिक संस्थेचे पप्पू खोत यांच्याकडे पाठविले. वैभव यांनी यापूर्वी अनेक प्राणी, पक्षी व सापांना जीवदान दिले आहे. त्यांना गजानन सुतार, अभिजित चव्हाण, कृष्णात भेंडे व मोनेश्वर सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो - २४०५२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - राजापूरवाडी (ता. शिरोळ) येथील जखमी घारीस वैभव गोते यांनी प्राथमिक उपचार करुन जीवदान दिले.

------------------------

जयसिंगपुरात महामार्ग बंद

जयसिंगपूर : येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील नटराज हॉटेलजवळ नाल्याचे पाईप बसविण्याचे काम सुरु असल्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. अकराव्या गल्लीतून ही वाहने जात असलीतरी कंटेनरसारखी मोठी वाहने नेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे नाल्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

------------------------

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करा

शिरोळ : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉकडाऊन केला आहे. सोमवारपासून सात ते अकरा ही वेळ नागरिकांना खरेदीसाठी देण्यात आली आहे. मात्र, या दरम्यान विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.