शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणी मंडल अधिकाऱ्याला अटक

By admin | Updated: July 2, 2016 00:15 IST

पाच हजारांची लाच : सात-बारा पत्रकीच्या नोंदीसाठी मागितली होती लाच

लाच प्रकरणी मंडल अधिकाऱ्याला अटकपाच हजारांची लाच : सात-बारा पत्रकीच्या नोंदीसाठी मागितली होती लाचहुपरी : विरोधी पक्षाने घेतलेली हरकत नामंजूर करून लीज पेन्डन्सीचा दस्त जमिनीच्या ७/१२ पत्रकी नोंद करून घेण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी हुपरी (ता. हातकणंगले) येथील मंडल अधिकारी के. एस. कोळी (वय ५८, रा. तळदगे) याच्या विरोधात लाचलुचपत विभागाने शुक्रवारी हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबतची तक्रार अमर एकनाथ शिंदे (रा. कसबा सांगाव, ता. कागल) यांनी लाचलुचपत विभागाकडे केली होती. याबाबतची अधिक माहिती अशी, अमर शिंदे यांची यळगूड (ता. हातकणंगले)हद्दीमध्ये शेती आहे. सध्या ही जमीन त्यांचे चुलते रामू बापू शिंदे यांच्या नावावर आहे. या जमिनीची रीतसर वाटणी झालेली नाही. या जमिनीच्या वाटणीबाबत अमर यांनी इचलकरंजी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्याचा निकाल लागण्याअगोदर चुलते रामू यांनी ही जमीन परस्पर विक्री करू नये किंवा कर्ज काढू नये यासाठी अमरच्या वडिलांनी हातकणंगले दुय्यम निबंधक यांच्याकडून लीज पेन्डन्सीचा दस्त करून घेतला आहे. या दस्ताची नोंद जमिनीच्या ७/१२ पत्रकी होण्यासाठी त्यांनी यळगूड गावकामगार तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. त्याप्रमाणे तलाठी भिऊंगडे यांनी जमिनीच्या ७/१२ पत्रकी त्याची नोंद घेतली आहे. याबाबतची माहिती समजताच रामू शिंदे यांनी त्या नोंदीस हरकत दाखल केली आहे. त्यामुळे दस्ताची नोंद व हरकत अशा पुढील कामाबद्दल आदेश होण्यासाठी तलाठी भिऊंगडे यांनी हे प्रकरण मंडल अधिकारी के. एस. कोळी यांच्याकडे पाठवून दिले होते; परंतु कोळी यांनी या प्रकरणाबाबत निर्णय घेण्यास विलंब लावून मंजुरी देण्यासाठी अमर शिंदे यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे अमर यांनी याबाबत १३ जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने दोन पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता मंडल अधिकारी कोळी यांनी अमर यांच्याकडे लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे व अप्पर पोलिस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदशर्नानुसार उपअधीक्षक उदय आफळे, निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार खणगावकर, हवालदार श्रीधर सावंत,आदींनी ही कारवाई पार पाडली. (प्रतिनिधी)तीन वेळा सापळा फसलालाचलुचपत विभागाने १४, १५, व २१जूनला हुपरी मंडल अधिकारी कार्यालयात सापळा लावला होता. त्यावेळी कोळी याना शंका आल्याने त्यांनी त्यावेळी लाच स्वीकारली नव्हती; परंतु लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने कोळी यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम ७ सह १३(२) अन्वये शुक्रवारी हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मंडल अधिकारी कोळी यांच्यावर अटकेची कारवाई केली.