शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

नाराजांची भूमिका ठरणार निर्णायक

By admin | Updated: May 11, 2016 00:54 IST

पेरणोली-गवसे गट : मातब्बरांविरोधात नवख्यांनी ठोकला शड्डू

ज्योतीप्रसाद सावंत--आजरा --३० गावांचा समावेश असणाऱ्या गवसे-पेरणोली उत्पादक गटामध्ये आजरा साखर कारखाना निवडणुकीकरिता चराटी-केसरकर यांच्या आघाडीतून दशरथ अमृते, इंद्रजित देसाई व राजू सावंत या नवख्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात आणले गेले आहे. तर राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीने उदय पवार, सुधीर देसाई या विद्यमान संचालकांसह माजी संचालक सदाशिव डेळेकर यांना संधी देऊन नेटके आव्हान उभारले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असणाऱ्या मंडळींची भूमिका या गटात महत्त्वाची ठरणार आहे.सर्वच पक्षांचे, संघटनांचे कार्यकर्ते या गटात आहेत. कारखाना कार्यक्षेत्र असणाऱ्या गवसे येथून दोन्ही प्रमुख आघाड्यांतून उमेदवारी नाही. ४०० मतदान असणाऱ्या खेडे या गावाचीही अवस्था फारशी वेगळी नाही. सहदेव नेवगे, श्रीपतराव देसाई, शिवाजी पाटील यांच्यासह अनेक मातब्बर या गटातून इच्छुक होते. डॉ. इंद्रजित देसाई यांनी तर प्रचारही सुरू केला होता. या सर्वांची भूमिका आता काय राहणार यावरही येथील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.साखर कारखाना राजकारणात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या देवर्डे येथूनही उमेदवारी देण्यात यावेळी मुख्य आघाड्यांना अपयश आले आहे. तालुका खरेदी-विक्री संघ, आजरा सूतगिरणी, जनता बँक येथे नेतृत्व करणारी मंडळी या गावात असूनही कारखान्याबाबत उपेक्षाच देवर्डेकरांच्या पदरी आली आहे.अशोकअण्णा चराटी यांचे कट्टर समर्थक दशरथ अमृते, स्वाभिमानीचे इंद्रजित देसाई व शिवसेनेचे राजू सावंत हे प्रथमच कारखाना निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर विरोधातील सुधीर देसाई, उदय पवार व सदाशिव डेळेकर यांनी संचालकपदाचा अनुभव यापूर्वी घेतला आहे. राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीत माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचा गटही मिसळल्याने राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँग्रेस थोडी वरचढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.