शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

भाळवणी विद्यालयात शिक्षिकेला बेदम मारहाण

By admin | Updated: February 18, 2015 23:43 IST

घरगुती वादातून प्रकार : विटा पोलिसांत गुन्हा दाखल

विटा : घरगुती वादातून भाळवणी (ता. खानापूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षिका सौ. सरिता उदय माने (वय ३३, रा. ढवळेश्वर, मूळ गाव मिरज) यांना त्यांच्याच दोन नातेवाईक महिलांनी विद्यालयातच बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी आज, बुधवारी दुपारी शिक्षिका सौ. सरिता माने यांनी निर्मला आनंदराव शेवाळे (रा. म्हासोली, ता. कऱ्हाड) व तिची आई जयश्री निवासराव जगताप (रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) या दोघींविरुध्द विटा पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.मिरज येथील सरिता माने अडीच वर्षापासून भाळवणी विद्यालयात शिक्षिका आहेत. त्यांचे पती खासगी रुग्णालयामध्ये जनसंपर्क अधिकारी आहेत. सोमवारी दुपारी २.३० वाजता सौ. माने शाळेत असताना एका महिलेने त्यांना बाहेर व्हरांड्यात व्यासपीठावर बोलाविले. त्यावेळी प्रवेशद्वारातून सौ. माने यांची आतेबहीण छाया शेवाळे यांची सून निर्मला शेवाळे व तिची आई जयश्री जगताप शाळेत आल्या. त्यावेळी निर्मला यांनी, ‘माझ्या पतीला तुझ्या वडिलांनी कोठे कामाला लावले आहे, तुझीही नोकरी घालविते’, असे म्हणत सौ. माने यांना या दोघांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत चावा घेऊन जखमी केले. त्यावेळी शाळेतील अन्य कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. त्यानंतर सौ. माने यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर आज, बुधवारी निर्मला शेवाळे व तिची आई जयश्री जगताप या दोघींविरुध्द विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)