शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर सौंदत्ती यात्रेवर बहिष्कार

By admin | Updated: December 2, 2015 01:16 IST

रेणुका भक्त मंडळ आक्रमक : बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

कोल्हापूर : येत्या २४ डिसेंबर रोजी सौंदत्ती (कर्नाटक) येथे डोंगरावर यलम्मा देवीची यात्रा भरते. या यात्रेसाठी तीन दिवस कोल्हापूर शहरातील यात्रेकरू मोठ्या संख्येने जातात; पण तेथे यात्रेकरूंना मूलभूत सुविधांपासून वंचित राहून गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने करवीरनिवासिनी रेणुका भक्त संघटनेच्या वतीने बेळगाव येथे जाऊन जिल्हाधिकारी एन. जयराम यांची भेट घेऊन निवेदन दिले. मूलभूत सुविधा पुरवणार नसाल तर या सौंदत्ती यात्रेवर बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.डिसेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी तात्पुरती व्यवस्था करण्याचे आश्वासन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या कायमस्वरूपी मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या सुविधा पोळ्याच्या पौर्णिमेपर्यंत पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. सौंदत्ती येथे २४ डिसेंबर रोजी रेणुका (यलम्मा) देवीची यात्रा भरत आहे. यासाठी कोल्हापूर शहर आणि परिसरातून सुमारे साडेचार लाख भाविक मुख्य यात्रेच्या तीन दिवस अगोदर सांैदत्ती डोंगरावर दाखल होतात. हे सर्व भाविक उघड्या माळावर राहत असल्याने तेथे या भाविकांना गैरसोयींचा सामना दरवर्षी करावा लागतो. जुगुळबाई देवीचा अस्वच्छ कुंड, तेथे महिला आणि पुरुषांना अंघोळीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, शौचालयांचीही सोय करावी, तसेच डोंगरावर गेल्यावर तेथेही अंघोळीसाठी सुसज्ज सोय करावी, सार्वजनिक वीजखांबांवरील दिवे घालविण्याचे होणारे प्रकार थांबावेत, रेणुका मंदिरात तत्पर दर्शनासाठी ५० रुपये असताना १०० रुपये अनधिकृतपणे उकळले जातात, अशीही तक्रार यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. बेळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या करवीरनिवासिनी रेणुका भक्त मंडळाच्या शिष्टमंडळात अध्यक्ष प्रशांत खाडे, उपाध्यक्ष बाबूराव पाटील, सचिव उदय पाटील, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर, किरण मोरे, सदाशिव सावंत्रे, सुरेश बिरंबोळे, सुनील मोहिते, बाबा कराळे, अनिता पाटील, मंगल महाडिक, नगरसेवक निलोफर आजरेकर, अशकीन आजरेकर व रेणुका भक्त मंडळाचे ७५ कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाहीडिसेंबरमधील यात्रेपुरती तात्पुरती व चांगली सोय करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी दिले; तर कायमस्वरूपी पिण्याचे पाणी, अंघोळीसाठी शॉवर व महिलांसाठी शौचालय करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागेल. त्याबाबत निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे ते म्हणाले. यंदा डोंगरावर यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.