शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याच्या वाहिनीतून निघाल्या बाटल्या, चपले, गोणपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोडवरील तब्बल १४ कॉलन्यांचा पाणीपुरवठा गेल्या चार- पाच दिवसांपासून बंद होता. नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी ...

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोडवरील तब्बल १४ कॉलन्यांचा पाणीपुरवठा गेल्या चार- पाच दिवसांपासून बंद होता. नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. रस्त्यावर दोन ठिकाणी केलेल्या खुदाईनंतर पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीत प्लास्टिकच्या बाटल्या, चपला, गोणपाट आदी अडकून पडल्याचे आढळले. या जलवाहिनीत अशा प्रकारचा कचरा अडकून वारंवार पाणीपुरवठा खंडित होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, हा कचरा जलवाहिनीत कोठून येतो, याचा पाणीपुरवठा विभागाने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

फुलेवाडी रिंग रोडवरील बहुतांशी कॉलन्यांमध्ये गेल्या आठवडाभर पाणीपुरवठा खंडित झाला होता. भागातील सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, नागदेववाडीचे ग्रामपंचायत सदस्य समीर पोवार, माजी सरपंच मंगेश गुरव, माजी सदस्य दीपक माळवदे, विजय तायशेटे यांनी महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करून पाणीपुरवठा सुरळीत केला. रिंग रोडवर अयोध्या कॉलनी व बोंद्रेनगर येथे खुदाई केल्यानंतर जलवाहिनीत चपला, बाटल्या, गोणपाट आदी कचरा मिळून आला. जलवाहिनीतील हा कचरा काढण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीही अशाच पद्धतीने याच जलवाहिनीतून कचरा बाहेर काढला होता. वारंवार उद्‌भवणाऱ्या समस्यांना नागरिक त्रासले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत हा कचरा कोठून येतो? याचा महापालिकेने शोध लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कॉलनीतील पाणीपुरवठा खंडित

गजानन कॉलनी, अयोध्या कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, ग्रामसेवक पार्क, महालक्ष्मी पार्क, तसेच सद्‌गुरू कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, सोनाई पार्क, शिवशक्ती कॉलनी, भोगम पार्क, गणेश पार्क, महेश्वर कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी या कॉलन्यांतील पाणीपुरवठा खंडित झाला.

बिल्डर, पदाधिकाऱ्यांचे लाड

परिसरात सर्व कॉलन्यांत रिंग रोडवरील ४ इंची जलवाहिनीतून पाणी कनेक्शन दिली आहेत; पण काही बांधकाम व्यावसायिकांनी रिंग रोडवरून गेलेल्या १६ इंची या मुख्य जलवाहिनीवरून पाणी कनेक्शन घेतली आहेत. काहींनी आपल्या फार्म हाऊससाठीही याच मुख्य जलवाहिनीवरून पाणी कनेक्शन घेतली आहेत; पण महापालिकेच्या डोळेझाक कारभारामुळे याची वाच्यता करण्यास कोणीही तयार नसल्याची परिसरात चर्चा आहे.

फोटो नं. ०६०५२०२१-कोल-फुलेवाडी०१,०२

ओळ : फुलेवाडी रिंग रोडवर अयोध्या कॉलनी व बोंद्रेनगर या दोन ठिकाणी खुदाई करून पाणीपुरवठ्याच्या वाहिनीतील कचरा काढण्याचे काम सुरू आहे.

फोटो नं. ०६०५२०२१-कोल-फुलेवाडी०३

ओळ : जलवाहिनीच्या कचऱ्यातून काढलेली बाटली.

===Photopath===

060521\06kol_10_06052021_5.jpg~060521\06kol_11_06052021_5.jpg

===Caption===

फोटो नं. ०६०५२०२१-कोल-फुलेवाडी०१,०२ओळ : फुलेवाडी रिंगरोडवर आयोध्या कॉलनी व बोंद्रेनगर या दोन ठिकाणी खुदाई करुन पाणीपुरवठ्याच्या वाहिनीतील कचरा काढण्याचे काम सुरु आहे. फोटो नं. ०६०५२०२१-कोल-फुलेवाडी०३ओळ : जलवाहिनीच्या कचर्यातून काढलेली बाटली~फोटो नं. ०६०५२०२१-कोल-फुलेवाडी०१,०२ओळ : फुलेवाडी रिंगरोडवर आयोध्या कॉलनी व बोंद्रेनगर या दोन ठिकाणी खुदाई करुन पाणीपुरवठ्याच्या वाहिनीतील कचरा काढण्याचे काम सुरु आहे. फोटो नं. ०६०५२०२१-कोल-फुलेवाडी०३ओळ : जलवाहिनीच्या कचर्यातून काढलेली बाटली