शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

बेळंकी खूनप्रकरणी दोघे ताब्यात

By admin | Updated: December 16, 2014 00:49 IST

कसून चौकशी : पोलीस पथके कर्नाटकात रवाना; दोन दिवस पोलीस फौजफाटा तळ ठोकून

मिरज : बेळंकीत झालेल्या दोन महिलांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. वैयक्तिक वाद किंवा मालमत्तेसाठी हे खून झाल्याचा संशय असल्याने दोघांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे कर्नाटकातही पोलिसांची पथके रवाना झाली आहेत, मात्र अद्याप कोणतीच ठोस माहिती हाती लागली नाही. बेळंकीत शनिवारी रात्री यल्लम्मादेवी यात्रेतून परतणाऱ्या महिलांवर दोघांनी चाकूहल्ला करून लूटमार केली. चाकूहल्ल्यात सुनीता गायकवाड व मंगल घेवारे या दोघींचा मृत्यू झाला. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक देवीदास सोनवणे यांच्यासह पोलीस फौजफाटा दोन दिवस बेळंकीत तळ ठोकून आहे. कर्नाटक पोलिसांच्या मदतीने कर्नाटकात गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. सुनीता गायकवाड यांच्यावर चोरट्यांनी चाकूने सपासप आठ वार केले आहेत, तर मंगल येवारे यांच्यावर चाकूचा एकच वार झाला आहे. यामुळे सुनीता गायकवाड यांना ठार मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आला होता का? याची सखोल चौकशी सुरू आहे. वैयक्तिक वाद, अनैतिक संबंध किंवा मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशाने हा खून झाला आहे काय, याच्या चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र त्यांच्या चौकशीतून अद्याप ठोस पुरावे हाती लागले नसल्याची माहिती मिळाली. बेळंकी रेल्वे स्थानकाजवळून चोरट्यांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या मोटारसायकलचा शोध सुरू आहे. चोरी व लूटमारीच्या उद्देशाने खून करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही शोध सुरू आहे. बेळंकीत तंबू ठोकून पोलीस वेगवेगळ्या गुन्हेगारांची चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी) चोरी किंवा वैयक्तिक कारण : सावंतपोलीसप्रमुख दिलीप सावंत म्हणाले की, यातील मृत सुनीता गायकवाड यांचे लहानपणीच लग्न झाले होते. पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. हल्ल्यात सर्वाधिक आठ वार त्यांच्यावर झाले आहेत, तर मंगल घेवारे यांच्यावर केवळ एकच वार झाला आहे. चोरटे दागिने चोरण्यासाठी अगदी ठार होईपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात वार करणार नाहीत. त्यामुळे हे दुहेरी हत्याकांड ऐवज लुटीसाठी झाले आहे, का यामागे वैयक्तिक काही कारण आहे, अशा दोन्ही बाजू विचारात घेऊन तपासाला गती दिली आहे.