शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काँग्रेसचे ‘ताराराणी’च टार्गेट

By admin | Updated: August 10, 2015 01:07 IST

महापालिका निवडणूक : ३०-३० जागांवरच लक्ष केंद्रित करून सारी ताकद लावणार

राजाराम लोंढे - कोल्हापूर महापालिकेची निवडणूक सध्या चौरंगी वाटत असली तरी काँग्रेस व राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीचे खरे टार्गेट ताराराणी आघाडीच आहे. ‘ताराराणी’च्या कारभाऱ्यांचे निवडणुकीतील डावपेच माहिती असल्याने दोन्ही काँग्रेसने त्याच पद्धतीने आपली चाचपणी सुरू केली आहे. दोन्ही आघाड्यांनी सर्व ८१ जागा लढविण्याचा निर्धार केला असला तरी ‘ताराराणी’ला रोखण्यासाठी ३०-३० जागांवरच अधिक लक्ष केंद्रित करून तिथेच सारी ताकद लावली जाणार आहे. गेली पाच वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी-जनसुराज्य सत्तेत होती. या निवडणुकीतहीही आघाडी कायम राहिली असती, पण इच्छुकांची नाराजी अंगावर ओढवून त्याचा फायदा विरोधकांना होईल, या भीतीनेच दोन्ही काँग्रेस विशेषत: आमदार हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वबळाचा शड्डू ठोकला. त्यात शिवसेना व भाजपने सवतासुभा केल्याने चौरंगी लढत निश्चित आहे. कोणत्याही एका पक्षाला सत्तेची ‘४१’ फिगर गाठणे कठीण आहे. महापालिकेच्या राजकारणातील मुरब्बी म्हणून ‘ताराराणी’ आघाडीकडे पाहिले जाते. या आघाडीने भाजपबरोबर हातमिळवणी केल्याने शिवसेनेला एकाकी झुंज द्यावी लागणार आहे. काँग्रेसने स्वबळाची भाषा केली असली तरी नेत्यांचे अजून मलोमिलन व्हायचे आहे. सतेज पाटील यांनीच चाचपणी सुरू केली असून, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती अजून पडद्यामागेच आहेत. आमदार महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यात समझोता करण्याचा प्रदेश काँग्रेसचा प्रयत्न असला तरी ते अशक्य आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना सोबत घेऊनच रिंगणात उतरावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व्हेच्या माध्यमातून चाचपणी सुरू केली आहे. प्रभागात इच्छुकांपैकी पहिल्या तीनजणांशी चर्चा सुरू आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीला २५ ठिकाणी यश मिळाले, तर त्यांचे बारा उमेदवार थोडक्या मताने पराभूत झाले. अशा ४० जागांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. उर्वरित ठिकाणी ताकदीचे नवीन चेहरे मिळतात का? यासाठी फासे टाकले जात आहेत. एकंदरीत राजकीय आडाखे पाहता काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर भाजप-ताराराणी आघाडीचेच खरे आव्हान आहे. त्यामुळे ‘ताराराणी’च्या हालचालीवर दोन्ही काँग्रेसचे लक्ष आहे. ६०-२१ चा फॉर्म्युलाराष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य पक्षामध्ये आघाडी निश्चित झाली असली तरी जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. तरीही गत निवडणुकीतील प्रभाग, इच्छुकांची संख्या पाहून राष्ट्रवादी ६०, तर जनसुराज्य २१ ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचेविद्यमानांना सिग्नलराष्ट्रवादीच्या विद्यमान २५ नगरसेवकांपैकी बुहतांशी पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. नवीन प्रभागाचा अंदाज घेऊन विद्यमान नगरसेवकांना कामाला लागण्याचे आदेश राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले आहेत. सत्तेविना दोन्ही काँग्रेस रिंगणात गत निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात व केंद्रात सत्तेत होती. त्यामुळे निवडणूक त्यांना सोपी गेली होती. सत्तेत असल्याने ‘ताकद’वान उमेदवार मिळालेच, त्याचबरोबर पक्षाकडूनही चांगली रसद पुरविली होती, पण आता सत्तेविना दोन्ही काँग्रेस रिंगणात उतरल्याने ८१ जागांवर ताकदीने निवडणूक लढविणे तितकेसे सोपे राहिले नाही.