: लोकमत न्यूज नेटवर्क :
कोरोनावरील उपचार सुरू असताना सकारात्मक विचार व आनंदी राहणे गरजेचे आहे. म्हणूनच चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. रुग्णांनी त्याचा उपयोग करावा, असे प्रतिपादन साहित्यिक बाबूराव शिरसाट यांनी केले. ते राधानगरी कोविड सेंटरला पुस्तके भेट देताना बोलत होते. शिरसाट यांनी राधानगरी कोविड सेंटरला ५१ पुस्तके तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे यांच्याकडे सुपूर्द केली.
प्रास्ताविक विस्तार अधिकारी आर. एस्. पाटील यांनी केले. डॉ. शेटे, बालसाहित्यिक प्रकाश केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. संग्राम पाटील, डॉ. रणजीत पाटील, समाधान कांबळे, विनायक पाटील,अश्विनी वरूटे उपस्थित होते. महेंद्र टिपुगडे यांनी आभार मानले. —————————————— फोटो ओळ * * * * * * * * * *राधानगरी कोविड सेंटरला पुस्तके भेट* देताना*
साहित्यिक बाबूराव शिरसाट,सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शेटे,आर.एस. पाटील व इतर.