शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बांबवडेत वाहतुकीच्या कोंडीची ‘कोंडी’ फुटेना

By admin | Updated: January 14, 2016 00:12 IST

नियोजनच नाही : शिस्त लावण्याची गरज; वाहनचालक त्रस्त

रामचंद्र पाटील ल्ल बांबवडे बांबवडे (ता. शाहूवाडी) या तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेला नियोजनाअभावी वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत असून, सर्व स्थरावर प्रयत्न करून बाजाराचे योग्य नियोजन लावणे गरजेचे आहे. बांबवडे हे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वसलेले असून, येथील आठवडी बाजार गुरुवारीच भरतो. या मार्गालगतच मुख्य बाजारपेठ आहे. या आठवडी बाजारामध्ये शाहूवाडीसह पन्हाळा व शिराळा तालुक्यांतील व्यापारी लोक येतात. तसेच महामार्गावर प्रवास करणारे प्रवासीही खरेदीसाठी थांबत असल्याने बाजारपेठेत गर्दी झालेली असते. मुख्य बाजार हा बसस्थानक परिसरात भरतो. येथूनच महामार्गावर जाता येते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहान-मोठी वाहने उभी असतात. दर पाच मिनिटाला एक ते दोन बस येथे थांबलेल्या असतात. त्यांच्या थांबण्याचे योग्य नियोजन नसते. दोन्ही बाजूला एक-दोन एस.टी. बसेस जरी थांबल्या तरीही वाहतुकीची कोंडी होते. यासाठी जाणाऱ्या गाड्या बसस्थानकाच्या बाजूला, तर कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या विरुद्ध बाजूला उभ्या राहण्यासाठी मलकापूर आगाराच्या स्वतंत्र कर्मचाऱ्याने पोलिसांच्या मदतीने नियोजन लावणे गरजेचे आहे. खासगी वाहतूक करणारी शेकडो वाहने याच परिसरात उभी राहिलेली असतात. यामुळे वाहतुकीची खरी कोंडी होते. आठवडी बाजारादिवशी ही वाहने या परिसरापासून दूर उभी राहण्याची व्यवस्था केली तर कोंडी सुटण्याची शक्यता आहे. परंतु, हे नियोजन लावण्याचे धारिष्ट बांबवडे पोलिसांत नसल्याचे स्पष्ट दिसून येते. येथेच भरणारा भाजीपाला मार्केट या परिसरातून वेगळ्या ठिकाणी भरविणे गरजेचे आहे. भाजीपाला मार्केट थोडेसे एका बाजूस तरी भरते; परंतु फळविक्रेते अगदी रस्त्यावरच फळांचे गाडे व ठेले मांडून बिनधास्त बसलेले असतात. अशीच परिस्थिती पिशवी येथील रोडवरही होते. तेथेही नेहमी वाहतुकीची कोंडी होते. तरी जनावरांच्या बाजाराशेजारी जे मार्केटचे गाळे आहेत तेथे बाजार भरणे गरजेचे आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नोकरदार वर्ग कामावरून आल्यावर प्रत्येकाचे वाहन जागा मिळेल तेथे पार्किंग होते. या वेळेत वाहतुकीची कोंडी जास्त होते. सध्या ऊस वाहतुकीची कोंडी जास्त होते. सध्या ऊस वाहतूक व बॉक्साईट वाहतूकही जोरात सुरू असल्यानेही वाहतुकीची कोंडी होते. ऊस, बॉक्साईट वाहतूक ४सध्या ऊस आणि बॉक्साईट वाहतूकही जोरात सुरू असल्यानेही कोंडीत भर पडत आहे. ४ आठवडा बाजारादिवशी तर येथे चालणेही मुश्कील होते.