शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बोलेरो-दुचाकीची धडक; दोन तरुण ठार

By admin | Updated: September 21, 2014 01:24 IST

चिक्कोडीजवळ अपघात : मृत गडहिंग्लज, हसूरवाडीचे

निपाणी/संकेश्वर : बोलेरोे व हिरो होंडा पॅशन प्रो या दुचाकीत धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील चालक संदीप तानाजी जाधव (वय २६, मूळगाव हसूरवाडी, ता. गडहिंग्लज, सध्या रा. शिवाजी चौक, गडहिंग्लज), संदीप शिवाजी पाटील (२५, रा. शिवाजी चौक, गडहिंग्लज) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संकेश्वरपासून १० कि. मी. अंतरावरील बोरगल फाट्यानजीक सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तोरणहळ्ळी (ता. चिक्कोडी) येथील मारुती देवाच्या दर्शनासाठी नवीन दुचाकीवरून (पॅशन प्रो-नंबर नाही) संदीप जाधव व संदीप पाटील हे गडहिंग्लजहून संकेश्वरमार्गे चिक्कोडीकडे जात होते. दरम्यान, बोरगल फाट्यानजीक आल्यावर समोर असणाऱ्या क्रुझर वाहनाचा वेग कमी झाल्याने दुचाकी बाजूला घेऊन ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या बेलोरो गाडी (केए २३, एम ८१८५)ला दुचाकीची जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक संदीप जाधव याच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागे बसलेला संदीप पाटील हा उडून बेलोरो गाडीवर जाऊन आदळल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी संकेश्वरला आणतेवेळी वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. संदीप जाधव याने सध्या नवीन दुचाकी गाडी घेतली होती. दरम्यान, गडहिंग्लज भागातील काही युवक तोरणहळ्ळीला देवदर्शनाला जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यामधील काही युवकांना अपघातातील जखमी व मृत संजय यांची ओळख पटल्याने त्यांनी तत्काळ नातेवाइकांना व मित्रांना अपघाताची माहिती दिली. लक्ष्मण शिवाप्पा बिसनाईक (रा. हल्याळ, ता. अथणी) यांच्या फिर्यादीवरून अपघाताची संकेश्वर पोलिसांत नोंद झाली आहे. घटनास्थळी गोकाक विभागीय अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक न्यामगौडर, मंडल पोलीस उपनिरीक्षक एस. सी. पाटील यांनी भेट दिली. अधिक तपास संकेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक कुमार हितलमणी करीत आहेत. संदीप पाटील व संदीप जाधव हे दोघेही जिवलग मित्र होते. ते गडहिंग्लज शहरातील बॉम्बे क्लॉथ सेंटर या कापड दुकानात कामास होते. संदीप पाटील याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, तर संदीप जाधव याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. संदीप जाधव हा शिवसेनेच्या गडहिंग्लज शहर महिला संघटक मंगल जाधव यांचा मुलगा आहे. (प्रतिनिधी)