साखरवाडी : नीरा नदीपात्रात गेल्यावर्षी मिळून आलेला मृतदेह कोणाचा आहे हे अजूनही उलगडू शकले नाही. याबाबत माहिती असल्यास साखरवाडी दूरक्षेत्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या वर्षी २८ जुलैला मुरूम, ता. फलटण गावाजवळ नीरा नदीपात्रात कंजाळच्या गवतामध्ये ३५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह मिळून आला होता. याबाबतची फिर्याद मुरूम येथील धनंजय धोंडिराम झेंडे यांनी दिल्यानंतर मृतदेहाची बेवारस म्हणून नोंद करण्यात आली. आसपासच्या गावात चौकशी केली असता ओळख पटली नाही. पोलीस हेड कॉन्स्टेबल तपास करीत आहेत. कोणास माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.(वार्ताहर)
नीरेत सापडलेला मृतदेह वर्षभरानंतरही ‘अनोळखी’
By admin | Updated: August 7, 2014 00:14 IST