शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बेकरी कामगाराचा निर्घृण खून

By admin | Updated: July 16, 2014 01:41 IST

इचलकरंजीतील घटना :

इचलकरंजीतील घटना : तीक्ष्ण हत्याराने ४० ते ४२ वार; दोघे संशयित ताब्यात बेकरी कामगाराचा निर्घृण खून इचलकरंजी : येथील नदीवेस परिसरातील नरसोबा कट्टा येथे राहणाऱ्या महादेव इराप्पा टकळगी (वय २१) या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने ४० ते ४२ वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना काल, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नदीवेस नाक्याजवळ असलेल्या वीटभट्टीजवळ घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. आर्थिक देवघेव किंवा अनैतिक संबंधातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या खुनाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर एक पथक तपासासाठी कर्नाटकच्या दिशेने रवाना झाले आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मृत महादेव हा येथील बिग बझारजवळील बालाजी बेकरीमध्ये भट्टीवर काम करीत होता. काल रात्री त्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी ४० ते ४२ वार करून निर्घृण खून केला. यामध्ये महादेवच्या डोक्यात, गळ्यावर, छातीवर, पोटावर वार करण्यात आले होते. आज, मंगळवारी सकाळी फिरायला जाणारे नागरिक व अंगारकी संकष्टीनिमित्त नदीवरील गणपती मंदिराकडे जाणाऱ्या नागरिकांना महादेवचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. तेथे महादेव मृतावस्थेत पडलेला आढळला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह नगरपालिकेच्या आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. तेथून नातेवाइकांच्या ताब्यात दिला. घटनास्थळावरून पोलिसांनी जांबिया, दारूची बाटली व दगड जप्त केला आहे. दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी मारेकऱ्यांची शोधाशोध सुरू केली. प्राथमिक तपासासाठी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, यातील एकजण अल्पवयीन असल्याचेही समजते. नेमका खून कोणत्या कारणासाठी केला व (पान ४ वर)