आजरा : आजरा तालुक्यातील पारपोली येथे आंब्याचे पाणी या ठिकाणी असणार्या वनतळ््यावर ब्लॅक पँथर (काळा बिबट्या) कॅमेराबद्ध झाला आहे. पूर्ण वाढ झालेल्या या बिबट्याच्या अस्तित्वाने आजरा तालुक्यातील जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) एम. के. राव, गिरीष पंजाबी (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा तालुक्यात चाव्होबा व पारपोली येथे पाण्याच्या ठिकाणी कॅमेरा बसविण्यात आले होते. १३ ते २९ मे या कालावधीत पारपोली येथील वनतळ््यावर मोर, सांबर, ससे, हुक्कर, आदी वन्यजीव कॅमेर्यात बंदिस्त झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डौलदार चालीच्या ब्लॅक पँथरची छबीही कॅमेर्यात बंदिस्त झाली आहे. नुकतेच हे कॅमेरे काढून चित्रीकरण पाहिले असता या ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. पारपोली परिसरात ब्लॅक पँथरचा वावर असल्याची चर्चा होती. आज, गुरुवारी त्याला अधिकृत दुजोरा मिळाला असल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी राजन देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पारपोलीत ‘ब्लॅक पँथर’
By admin | Updated: June 6, 2014 01:40 IST