शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगडमध्ये भाजपचे स्थान भक्कम

By admin | Updated: May 11, 2016 00:56 IST

सुरेश हाळवणकर : तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन

गारगोटी : भुदरगड तालुक्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने आपले अस्तित्व सिद्ध केले असून, भविष्यात तालुक्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तालुक्याचे राजकारण पूर्ण होणार नाही, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. भुदरगड तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष व यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष नामदार हिंदुराव शेळके हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई हे होते.यावेळी बोलताना आमदार हाळवणकर पुढे म्हणाले, भुदरगड तालुक्याला पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून विकासकामांसाठी भरघोस निधी दिला असून, त्याच्या माध्यमातून विकासाची गंगोत्रीच अवतरली आहे. त्याचा प्रसार करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करावेत.यावेळी बोलताना नामदार हिंदुराव शेळके म्हणाले, भाजपचा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर या तालुक्यातील प्रत्येक गावातील शाखेला भेट दिली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना इथल्या ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांपर्यंत पोहोचवलेल्या नाहीत. त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल देऊन अशा ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.दरम्यान, मेळावा सुरू होण्यापूर्वी भुदरगड तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी नामदार शेळके व आमदार हाळवणकर यांचे गारगोटी ते आकुर्डे असे मोटारसायकल रॅलीद्वारे जल्लोषी स्वागत केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे संचालक नाथाजी पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी मौनी विद्यापीठाचे शासन प्रतिनिधी अलकेश कांदळकर, उपाध्यक्ष संतोष पाटील, सुनील पाटील, सरचिटणीस नामदेव चौगले, सुनील तेली, विनायक देसाई, गारगोटी शहराध्यक्ष राहुल चौगले, रणजित आडके, ए. डी. कांबळे, अशोक येलकर, आनंदा रेडेकर, सुरेश सुतार, विक्रम पोवार, विनायक परुळेकर, भगवान शिंदे, रोहित देसाई, राजेंद्र पाटील, अवधूत राणे, अशोक चौगले, जोतीराम शिंदे, स्वप्निल देवेकर, निवास देसाई व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. हिंदुराव पाटील यांनी स्वागत, तर योगेश परुळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य धनाजीराव मोरस्कर यांनी आभार मानले. सुशांत मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)भुदरगड तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आमदार सुरेश हाळवणकर. यावेळी व्यासपीठावर नाथाजी पाटील, हिंदुराव शेळके, बाबा देसाई, अलकेश कांदळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.