शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीसाठी भाजपचा ‘कोल्हापूर पॅटर्न’

By admin | Updated: May 31, 2016 01:28 IST

इचलकरंजी --नगरपालिकां सार्वत्रिक निवडणुक

इचलकरंजी --आगामी निवडणुकीसाठी भाजपचा ‘कोल्हापूर पॅटर्न’राजाराम पाटील -- इचलकरंजीनगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची चाहूल राजकीय पक्ष व आघाड्यांना लागली असून, इचलकरंजीत शहर विकास आघाडी व भाजप असा एकत्रितपणे ‘कोल्हापूर पॅटर्न’ लढण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस फुटण्याची चिन्हे दिसत असतानाच राष्ट्रीय कॉँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पातळीवर मात्र ‘थांबा व पहा’ अशीच स्थिती आहे.सन २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत पालिकेच्या ५७ नगरसेवकांपैकी २९ राष्ट्रीय कॉँग्रेस, ११ राष्ट्रवादी कॉँग्रेस व १७ शहर विकास आघाडी अशी स्थिती आहे. आकड्यांचा विचार करता दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेवर असली तरी अलीकडील दीड वर्षात पालिकेतील राजकारणात झालेल्या घडामोडींमुळे अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. जानेवारी २०१५ मध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन बंड केले आणि त्यांच्या या बंडाला ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. परिणामी, दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीचे बहुमत; पण कामकाजावर वर्चस्व मात्र ‘शविआ’चे अशी विचित्र स्थिती इचलकरंजी नगरपालिकेची आहे.आगामी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे दोन लाख ९२ हजार लोकसंख्या आहे. त्याप्रमाणे ३१ प्रभागांत ६२ नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये ३१ नगरसेवक व ३१ नगरसेविका असतील. त्यापैकी मागासवर्गीयांसाठी सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेविका, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १७ नगरसेवकांपैकी नऊ नगरसेविका आणि सर्वसाधारण वर्गासाठी ३९ नगरसेवकांपैकी १९ नगरसेविका अशी आरक्षणे आहेत.राज्यातील ‘अ’ वर्गातील सर्वांत मोठी नगरपालिका इचलकरंजी असूनही गेल्या पाच वर्षांत नवीन वाढीव हद्दीतील भुयारी गटार योजनेची सुरुवात झाली. याशिवाय एकही भरीव विकासकाम नगरपालिकेच्या माध्यमातून झालेले नाही.बर्मन समितीप्रमाणे शहर स्वच्छतासर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इचलकरंजी नगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी बर्मन समितीच्या अहवालाप्रमाणे कर्मचाऱ्यांना काम दिले. तर सर्व २५ प्रभागांत घंटागाडीचा ठेका दिला. यामुळे पूर्वी १६ प्रभागांत स्वच्छतेचा ठेका होता, तो आता फक्त नऊ प्रभागांत राबविला जात आहे. परिणामी, इचलकरंजी पालिकेची साडेचार कोटी रुपयांची बचत झाली. हा उपक्रम जिल्हास्तरावर आदर्शवत ठरला. इतकेच नव्हे तर नगरपालिका प्रशासन संचलनालयानेही याची दखल घेत प्रशंसा केली.