शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीला जिल्हा बँकेत भाजप आव्हान देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:29 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या राजकारणावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची पकड घट्ट आहे. मात्र, ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या राजकारणावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची पकड घट्ट आहे. मात्र, बँकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवाडे व महादेवराव महाडिक यांनी आव्हान देण्याची व्यूहरचना आखली आहे. मंत्री मुश्रीफ यांनी गेल्या पाच वर्षांत ‘गोकुळ’सह जिल्हा परिषद पदाधिकारी बदलामध्ये बांधलेली मोट पाहता सत्ता कायम राखण्यात त्यांना कोणतीही अडचण दिसत नाही.

जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. मात्र, तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे काही उमेदवार रिंगणात उतरले होते.

गेल्या पाच वर्षांत बरीच समीकरणे बदलली असून राज्यात नव्याने आकारास आलेल्या महाविकास आघाडीमुळे येथे भाजप एकाकी पडले आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणाचे केंद्रबिंदू असलेली जिल्हा बँक व ‘गोकुळ’ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोडण्या लावल्या आहेत. त्यात ‘गोकुळ’मध्ये मोट बांधत यश संपादन केले. ‘गोकुळ’च्या निवडणुकीतच जिल्हा बँकेच्या राजकारणाची बीजे पेरली होती. आमदार विनय काेरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांना आपल्यासोबत घेत मंत्री मुश्रीफ यांनी बँकेची निवडणूक सोपी केली. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील हे विरोधात असले तरी जिल्हा बँकेमध्ये ते महाविकास आघाडीसोबतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री मुश्रीफ हे आमदार पाटील यांच्यासह पालकमंत्री पाटील, विनय काेरे, संजय मंडलिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जातील. बिनविरोधसाठी ते प्रयत्न करणार असले तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची व्यूहरचना पाहता बिनविरोधची शक्यता धुसर आहे. विकास संस्था गटात प्रत्येक तालुक्यात प्रतिस्पर्धी आहेत, त्यातील कोण हाताला लागू शकतो, याची चंद्रकांत पाटील, प्रकाश आवाडे, महादेवराव महाडिक यांची चाचपणी सुरू आहे.

शाहूवाडीसह चार तालुक्यांत निकराची झुंज

विकास संस्था गटात करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड, हातकणंगले, पन्हाळा, गडहिंग्लज येथे एकतर्फीच लढत होईल. शाहूवाडी, गगनबावडा, शिरोळ, आजरा येथे मात्र निकराची झुंज पहावयास मिळणार आहे.

सत्तारूढ पॅनलमध्ये दोन-तीनच नवीन चेहरे

सत्तारूढ गटाच्या पॅनलमध्ये फारसे चेहरे बदलले जाणार नाहीत. राखीव गटातील दोन-तीनच चेहरे नवीन राहणार आहेत.

अनिल पाटील यांच्यासाठी सत्तारूढ गटाचा प्रयत्न

गेल्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलमधून पतसंस्था गटातून एकमेव अनिल पाटील हे विजयी झाले होते. जिल्हा बँकेच्या कारभारात त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा झाला. त्यामुळेच पाटील हे सत्तारूढ गटासोबत रहावेत, असा प्रयत्न मंत्री हसन मुश्रीफ यांचा आहे.

सतेज पाटील यांची गगनबावड्यातून तयारी

पालकमंत्री सतेज पाटील यांनी विकास संस्था गटातून गगनबावड्यातून तयारी केली आहे. पाच वर्षांत संस्थात्मक राजकारणात त्यांनी लक्ष घातल्याने पी. जी. शिंदे यांच्यासमोर तगडे आव्हान राहणार आहे.

येथे होणार निकराची झुंज-

तालुका विद्यमान संचालक प्रतिस्पर्धी

गगनबावडा पी. जी. शिंदे सतेज पाटील

शाहूवाडी सर्जेराव पाटील-पेरीडकर मानसिंगराव गायकवाड

आजरा अशोक चराटी सुधीर देसाई

शिरोळ राजेंद्र पाटील-यड्रावकर विठ्लराव नाईक-निंबाळकर