शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

संघटनेत फू ट पाडणे भाजपला अशक्य

By admin | Updated: February 19, 2017 00:23 IST

राजू शेट्टी : दुधगावला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रचार

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फू ट पाडण्यासारखा हातोडा अद्याप तयार झालेला नाही. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गळ्यात मफ लर घातला तरी, त्यांच्या छातीवर संघटनेचा बिल्ला होता, त्यामुळे भाजपने संघटनेत फू ट पाडण्याचे स्वप्न पाहू नये, अशी टीका खा. राजू शेट्टी यांनी केली. कवठेपिरान जिल्हा परिषद गटात स्वाभिमानीचा उमेदवारच निवडून येणार येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दुधगाव (ता. मिरज) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवार श्रीमती सुरेखा अण्णासाहेब आडमुठे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शेट्टी बोलत होते. यावेळी अर्जुन वडगावे, पिराजी माळी, प्रकाश मगदूम यांची प्रुमख उपस्थिती होती. शेट्टी म्हणाले की, संघटनेचे नेते व कृषी राज्यमंत्री खोत राज्य सरकारमधील मंत्री आहेत. मुख्यमंत्री आल्याने ते कार्यक्रमासाठी गेले होते. सदाभाऊ आणि मी गेल्या पंचवीस वर्षांपासून संघर्ष करीत आलो आहे. एका क्षणात संघटनेत फू ट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा काहींचा डाव असला तरी, ती स्वप्ने भाजपने पाहू नयेत. मी आमदार झाल्यानंतर संघटना जिल्ह्यात पोहोचली आणि खासदार झाल्यानंतर संपूर्ण देशभर पोहोचली.मागील दोनवेळच्या लोकसभा निवडणुकीत दुधगाव परिसर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. या परिसरात संघटनेची ताकद वाढली आहे. त्याचा उपयोग कार्यकर्त्यांना नक्की होणार असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीशी रहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाबासाहेब सांदे्र, बंडू कागवाडे, पिंटू लटपटे, पिराजी माळी, शीतल तामगावे, भरत साजणे, सागर आडमुठे, सनी गडगे, पंचायत समितीच्या उमेदवार जयश्री डांगे, तुंगच्या माजी सरपंच कल्पना पाटील, संगीता गुरव उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुढील वर्षापर्यंत : कर्जमाफ ीशेतीचे उत्पादन वाढते, मात्र सरकारकडून दर मिळत नाही. शेतकरी अडचणीतून वाटचाल करीत आहे, परंतु सरकार वेळकाढूपणाची भूमिका स्वीकारत असल्याचे दिसते. पुढील वर्षापर्यंत कर्जमाफीसाठी पाठपुरावा करणार असून, त्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास सध्याच्या सरकारची मागील सरकारसारखी स्थिती होईल, असा इशाराही त्यांनी दिला.