शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

‘भाजप-ताराराणी’ची कागल-मुरगूडला एन्ट्री?

By admin | Updated: July 7, 2016 00:40 IST

दादांना फुलवायचेय ‘कमळ’ : महादेवराव महाडिक यांच्याकडूनही संपर्क

कागल : तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी कागल तालुक्यात जोरदार आघाडी उघडण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कागल आणि मुरगूड शहरातील काही कार्यकत्याबरोबर थेट संपर्क साधून प्राथमिक चर्चा केल्याचे विश्वसनीय वृत आहे. कागल-मुरगूडमध्ये भाजप-ताराराणी आघाडीच्या माध्यमातून पॅनेलचीही जुळवाजुळव सुरू केली आहे. या दोन्ही शहरात मंत्री ‘चंद्रकांतदादांना कमळ’ फुलवायचे आहे आणि आमदार मुश्रीफांना ‘शह’ द्यायचा आहे. तर महादेवराव महाडिक यांना आ. सतेज पाटील यांना पाठबळ दिलेल्यांचे ‘उठ्ठे’ काढायचे आहे. या अंजेड्यातून कागल-मुरगूडमध्ये भाजप-ताराराणी आघाडी उतरत आहे.कागल शहरात आ. मुश्रीफ आणि समरजजितसंह घाटगे एकत्र लढणार की स्वतंत्र ताकद अजमाविणार याबद्दल तर्क-वितर्क सुरू आहेत. मंत्री चंद्रकांतदादांनी समरजितसिंह घाटगे यांनी स्वतंत्र आघाडी करावी, त्यास भाजप पाठिंबा देईल, अशी भूमिका मांडली आहे. तर महादेवराव महाडिक यांना आपले नातेवाईक असणारे अखिलेशराजे घाटगे (कागल ज्युनियर) यांना पुढे करून ताराराणी आघाडी करावयाची आहे. या आघाडीत पाटील यांना पाठबळ देणाऱ्या मुश्रीफ-समरजितसिंह घाटगे आघाडीला ‘शह’ देण्याचा त्यांचा इरादा आहे. या भाजप-ताराराणी आघाडीच्या मोर्चेबांधणीची कुणकुण लागल्याने आ. मुश्रीफांनीही मंडलिक गटालाही सोबत घेत कागलमध्ये भक्कम आघाडी करता येईल का? याची चाचपणी सुरू केली आहे. मुरगूडमध्ये रणजितसिंह पाटील हे महाडिक समर्थकच आहेत. मात्र, नगरपालिकेत आ. मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली काम करतात. येथे मंडलिक गटाची भूमिका महत्त्वाची असल्याने या गटाला पुढे करून पाटील-मुश्रीफ गटाला शह देण्यासाठी काय करता येईल, याबद्दल ‘बिद्री’चे संचालक राजेखान जमादार यांच्याकडून मंत्री चंद्रकांतदादांनी काही ‘टिप्स’ घेतल्याचे समजते. त्यातून तेथे भाजपप्रणीत आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुरगूडकर पाटील बंधू आणि मंडलिक गटातील राजकीय ईर्षेमुळे महादेवराव महाडिक यांना राजकीय व्यूहरचना करताना कसरत करावी लागत आहे. तर मंत्री पाटील यांनी या दोन नगरपालिकांत ‘कमळ’ फुलवायचे याच एका अजेंड्यावर लक्ष केंद्रित केले आहे.‘कमळ’ चिन्हावरचा नगराध्यक्ष हवाकागल तालुक्यातील या दोन्ही नगरपालिकांचे प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी काम सुरू केले आहे. सर्वच नेते मंडळीही कसे आणि कोणासोबत, कोणाविरूद्ध लढायचे? याचा अंदाज घेत आहेत. जाहीर झाल्यानंतर या घडामोडींना वेग आला असून, भाजप नेतृत्वाला तर या दोन्ही पाटीलांपैकी एका तरी ठिकाणी कमळ चिन्हावरचा नगराध्यक्ष हवा आहे. केंद्रात आणि राज्यात असणाऱ्या सत्तेचा लाभ आणि वलयाचा फायदा त्यांनी गृहीत धरला आहे. मुरगूडमधील गट-तटमुरगूडकर पाटील बंधू-आ. मुश्रीफांची युती येथे विद्यमान सत्ताधारी म्हणून आहे. मंत्री चंद्रकांतदादा यांना या युतीतून पाटील बंधूना बाहेर काढून तेथे भाजप प्रणीत नवी राजकीय मोट बांधायची आहे. त्यासाठी राजेखान जमादारांशी चर्चा केली आहे; पण येथे मंडलिक गटाची भूमिका महाडिक आणि मंत्री पाटील यांच्यासाठी अडथळ्याची ठरत आहे.