शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचीच सत्ता

By admin | Updated: March 11, 2017 23:35 IST

चंद्रकांतदादा पाटील यांचा दावा : फक्त औपचारिकता बाकी, संख्याबळ गाठले ४० पर्यंत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेना, मित्रपक्ष आघाडीची सत्ता येईल, त्याबाबत घोषणाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केला. विविध राज्यांत भाजप सत्तेपर्यंत पोहोचल्याने त्याचा विजयोत्सव करण्यासाठी ते कोल्हापुरातील शिवाजी चौकात आले असता पत्रकारांशी बोलत होते.कोल्हापुरातील जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची येणार? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी (दि. १४) अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावली आहे; पण शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने साऱ्यांची उत्सुकता ताणली आहे.याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेवर कोणत्याही परिस्थितीत भाजप-शिवसेनेचीच सत्ता स्थापन होण्यास काहीच हरकत नाही. याबाबत वरिष्ठ आणि स्थानिक पातळ्यांवरील नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. दोन्ही पक्षांची मने जुळली असल्याने जिल्हा परिषदेवर भाजप-सेनेचा झेंडा फडकण्यास काहीही अडचण नाही. सोमवारी अध्यक्ष निवडीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. सत्तेसाठी आवश्यक असणारा ३४ सदस्य संख्याबळाचा आकडा केव्हाच पार केला असून, तो ४० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेबाबतची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे.विरोधकांच्या सत्तेच्या दाव्याबाबत पाटील म्हणाले, कोणताही विरोधक हा सत्तेसाठी प्रयत्न करणारच; त्याप्रमाणे कोल्हापुरात विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. विविध राज्यांतील निवडणूक निकालापूर्वीही विरोधकांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, असा दावा केला होता, तसाच दावा कोल्हापुरात सुरू असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)