शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा कोल्हापुरात जल्लोष,

By admin | Updated: March 11, 2017 16:16 IST

शिवाजी चौकात जिलेबी वाटून आनंदोत्सव

भाजपचा कोल्हापुरात जल्लोष, शिवाजी चौकात जिलेबी वाटून आनंदोत्सवकोल्हापूर : चार राज्यातील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने यश मिळविल्याचे जाहीर होताच शनिवारी सकाळी कोल्हापूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहला उधाण आले. येथील बिंदू चौक सबजेलजवळील भाजप कार्यालयात दूरचित्रवाहिनीवर निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्ते सकाळी लवकरच हजर होते. जसजसे निकाल जाहीर होत गेले, तसतसे कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात धाव घेतली, आणि ढोल ताशांच्या गजरात नृत्य करुन जल्लोष केला. यावेळी त्यांनी शहरवासियांना जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केला. या जल्लोषात पालकमंत्री तथा महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटीलही सहभागी झाले. कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा या राज्यात भाजपची सत्ता येणार याची खात्री होती. त्यामुळे पक्ष कार्यालयात दूरचित्रवाहिनीसमोर बसलेल्या कार्यकर्त्यांना अपेक्षित निकाल सजमताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात निर्विवाद बहुमत मिळत असल्याचे पाहून सर्व कार्यकर्ते बिंदू चौक सबजेल येथील कार्यालयातून बाहेर पडले. हातात पक्षाचे ध्वज, गळ्यात स्कार्प आणि पक्षाची टोपी घातलेले कार्यकर्ते सकाळी साडे अकरा वाजता मध्यवर्ती शिवाजी चौकात पोहचले. ढोल ताशांचा गजर सुरु होताच कार्यकर्त्यांच्या या उत्साहाला अक्षरश: उधाण आले. कार्यकर्त्यांनी तालावर नृत्य करण्यास प्रारंभ केला. दरम्यान, महसुलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील तेथे पोहचताच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. पाटील यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवाजी चौकात जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांनी नृत्य करीत जल्लोष सुरु केला. त्यामध्ये गोकुळचे संचालक बाबा देसाई, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महापालिकेतील गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक आशिष ढवळे, अजित ठाणेकर, संभाजी जाधव, विजय खाडे, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, गीता गुरव, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, माजी नगरसेविका प्रभा टिपुगडे, माणिक पाटील चुयेकर, सुरेश जरग, विजय जाधव, राहूल चिकोडे, अमोल पालोजी, अशोक देसाई, नजीर देसाई, मारुती भागोजी, हेमंत आराध्ये, वैशाली पसारे, भारती जोशी, आकुबाई जाधव आदी सहभागी झाले.