शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

सत्तेतील भाजप आघाडी एकसंध नाही

By admin | Updated: March 29, 2017 00:55 IST

हसन मुश्रीफ यांचा पलटवार : पालकमंत्र्यांना रोजच ‘लॉलीपॉप’ दाखवावे लागते

कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना अपयशच येत गेल्यामुळे त्यांनी काहीही करून जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष करायचाच म्हणून विळ्या-भोपळ्याची मोट बांधून ही आघाडी केली आहे. या आघाडीत खूप मोठे मतभेद-हेवेदावे आहेत. भाजपची ही आघाडी एकसंध नाही. अन्यथा पालकमंत्र्यांना रोज ‘लॉलीपॉप’ दाखवावे लागले नसते, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी स्थानिक पत्रकारांना चहापान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आ. मुश्रीफ, आ. सतेज पाटील हे छोट्या मनाचे आहेत, अशी टीका केली आहे. त्या अनुषंगाने ते म्हणाले की, जनतेने आमच्यावर विरोधकांची जबाबदारी सोपवली आहे. ती आम्ही पार पाडीत आहोत. कोल्हापूर जिल्हा देशात अग्रेसर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. मी आणि सतेज पाटील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत आम्ही दिग्गज एकत्र असताना आमचे अंदाज फसले, चुकले. आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले प्रकाश आवाडे तसेच पाच वर्षे राष्ट्रवादीला बाजूला ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्हा परिषदेत सत्ता देण्याचे काम काँग्रेसने केल्याने खा. राजू शेट्टी काँग्रेसबरोबरच राहतील असा विश्वास होता, तर सत्तेच्या जोरावर आमचे दोन सदस्य गैरहजर राहिले. शेवटच्या क्षणी सत्यजित पाटील भाजप आघाडीत गेले. यामुळे हा विजय आमच्या हातून निसटला. मात्र, विरोधकांची भूमिका आम्ही निश्चितपणे चोखपणे पार पाडणार आहोत.आम्हीही १५ वर्षे सत्तेत होतो; पण सत्तेचा इतका गैरवापर केला नव्हता. खासदार महाडिकांच्या भूमिकेबद्दल विचारले असता आ. मुश्रीफ म्हणाले की, आज गुढीपाडवा शुभ दिवस आहे. चांगलेच बोलूया. आमच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना भैया माने यांनी बोलून दाखविल्याच आहेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)विकासासाठी पालकमंत्री बोलवतील तिथे जाऊमाझे गुरू कै. मंडलिकसाहेब म्हणायचे की, पृथ्वी गोल आहे. पृथ्वी निक्षत्रीय होऊ द्यायची नाही. विरोधकांची पोकळी राहता कामा नये. कोणीतरी माईचा लाल पुढे आला पाहिजे. म्हणून आम्ही प्रामाणिकपणे विरोधाची भूमिका पार पाडू; पण कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर पालकमंत्री जेव्हा बोलवतील, तेव्हा आम्ही तेथे हजर राहू.