शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या लुंग्यासुंग्यांनी देशभक्ती शिकवू नये : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:59 IST

हेरले : सीमेवर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जवान शहीद झाले असून, भाजपच्या लुंग्यासुंग्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, अशी घणाघाती टीका ...

हेरले : सीमेवर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जवान शहीद झाले असून, भाजपच्या लुंग्यासुंग्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, अशी घणाघाती टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते हेरले (ता. हातकणंगले) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी चौगुले होत्या.खासदार शेट्टी म्हणाले, भ्रष्टाचार, घोटाळे यांच्याविरोधात सदैव राहणार आहे. छप्पन इंच छातीचे जवान शेतकरी कष्टकरी कुटुंबातीलच आहेत. ते देशाचे संरक्षण करतात. सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांना शहिदाचा दर्जा दिला जावा. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, ठेकेदार, डांबरवाले यांच्याकडून किती पैसे चंद्रकांत पाटील यांनी उकळले याचे ठोस पुरावे आपणाकडे असून, कोल्हापुरातील बिंदू चौकात चंद्रकांत पाटील यांनी त्यांची तारीख जाहीर करावी. त्यांना बिंदू चौकात उत्तर देऊ. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता महाआघाडीच्या पाठीशीच राहणार आहे. संयमाचा बांध फुटला असून, तुम्हाला पायाखाली घेणार, असा सत्ताधाऱ्यांवर घणाघात खा. राजू शेट्टी यांना केला.स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील म्हणाले, खा. शेट्टींमुळेच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. २००२ ते २०१९ या १७ वर्षांत शेतकऱ्यांच्या उसास योग्य भाव त्यांनी मिळवून दिल्याने शेतकºयांच्या हृदयात त्यांचे कार्य बिंबले आहे. त्यामुळे देशातील शेतकºयांचे नेतृत्व करण्यासाठी सर्वसामान्य जनतेने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहावे आणि त्यांची हॅट्ट्रिक साधावी. यावेळी माजी सभापती राजेश पाटील, जि. प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, राहुल शेटे, भाऊसाहेब कस्बे, आप्पासाहेब एडके, वैभव कांबळे, डॉ. सनथकुमार खोत, संदीप चौगुले, मुनीर जमादार, आदगोंडा पाटील, बाळगोंड पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राजेंद्र गड्यान्नावर, सावकार मादनाईक, भगवान जाधव, युवा आघाडी संपर्क प्रमुख शुभम मोरे, माजी सभापती जयश्री कुरणे, बादशहा देसाई, रियाज जमादार, डॉ. विजय गोरड, लक्ष्मण निंबाळकर, अल्लाउद्दीन खतीब, आदी मान्यवरांसह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.