शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने गुंडांना सुधारण्याची शाळा काढली

By admin | Updated: February 19, 2017 00:12 IST

पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात : विकास आघाडीची जातीयवादी पक्षासोबत युती; गद्दारांना थारा देऊ नका

मलकापूर : भाजप सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही. भुलथापा मारत सरकार अशक्य अशा केवळ घोषणाबाजी करत आहे. पैशाच्या हव्यासापोटी भाजपने धनसंपत्ती असणाऱ्या गुंडांना पक्षात घेऊन गुंडांना सुधारण्याची शाळाच काढली आहे, असा घणाघाती आरोप करून जातियवादी पक्षाबरोबर छुपी युती करून गेली पस्तीस वर्षे कऱ्हाड दक्षिणेत गद्दारी करणाऱ्या आघाडीला या निवडणूकीत थारा देऊ नका, असे मत माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.मुंढे, ता. कऱ्हाड येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, मनोहर शिंदे, आनंदराव घोडके, अजित पाटील चिखलीकर, बंडानाना जगताप, राजेश पाटील-वाठारकर, इंद्रजीत चव्हाण, रामचंद्र पाटील उपस्थित होते.आमदार चव्हाण म्हणाले, राज्य व केंद्रातील भाजप सरकारने विजय मल्ल्या, ललीत मोदीसारख्या अनेकांना सहकार्य करून एका अर्थाने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. नोटाबंदीमुळे देशातील ४० लाख लोक बेरोजगार झाले आहेत. या निर्णयामुळे काहीही साध्य झालेले नाही. या सरकारला आम्ही नियोजित केलेले प्रकल्प अद्याप पूर्ण करता आले नाहीत. शेती मालाला हमी भाव देता आलेला नाही. उलट धनदांडग्या उद्योगपतींचे ऊखळ पांढरे करण्याचा घाट घातला आहे. खोटे बोल पण रेटून बोल, हा मंत्र घेऊन मोदी म्हणजे हिटलरचे दुसरे रूप आहे. ही हुकूमशाहीकडे जाणारी पावले वेळीच थांबवा. गुलाल तिकडे चांगभले म्हणणारी मंडळी राजकारणाला कलंक आहेत. (वार्ताहर)थेट चचेर्साठी मोदींना आव्हान भाजप सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व त्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील आणि देशातील जनतेला झालेला त्रास याबाबत मोदींनी माझ्याशी समोरासमोर चर्चा करावी. महाराष्ट्र व गुजरात राज्यपातळीवर चर्चा करण्यासाठी मोदींनी मुंबईत यावे किंवा मी अहमदाबादमध्ये येतो. त्यांनी माझ्याशी थेट चर्चा करावी, असे आव्हान माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींना दिले. चंद्रकांत पाटलांच्या गळाला मदनराव इतर पक्षातील पैसेवाल्यांना भाजपमध्ये घेऊन चंद्रकांत पाटलांनी त्यांची शेपटं कापण्याचेच काम केले आहे. आपल्यातून गेलेले काल मुख्यमंत्र्यांच्या व्यासपिठावर धरून आणल्यासारखे बसले होते. बाबांच्या मांडीलामांडी लावून बसणारे मदनराव चंद्रकांत पाटलांच्या गळाला लागले आहेत. जे जे पक्षाच्या विरोधात गेले त्यांचे वाटोळे झाले आहे, अशी कोपरखळी अजित पाटील-चिखलीकर यांनी मदनराव मोहीते यांना मारली.