शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची ट्रायल घ्यायला गेला अन् जिवाला मुकला

By admin | Updated: January 17, 2016 00:58 IST

सायबर चौकातील घटना

कोल्हापूर : मित्राने घेतलेल्या दोन लाख किमतीच्या हायफाय मोटारसायकलची ट्रायल घेताना भरधाव मोटारसायकल सायबर चौकातील दुभाजकाला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यश शिवाजी चावरेकर (वय १८, रा. ग्रीन पार्क, समता कॉलनी, मोरेवाडी) असे त्याचे नाव आहे. हा अपघात शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. एकुलत्या मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, यश चावरेकर हा राजाराम कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. सकाळी घरातून तो चहा-नाष्टा करून क्लासला जाण्यासाठी मोपेडवरून बाहेर पडला. राजारामपुरी चौदावी गल्लीतील क्लासला उपस्थित राहून तो शाहू मिल येथील मामाच्या घरी गेला. तेथून तो मित्र तुषार जिनकर याला घेऊन राजारामपुरी चौथी गल्लीमध्ये आला. या ठिकाणी त्याचा दुसरा मित्र दोन लाख किमतीची नवीन मोटारसायकल घेऊन उभा होता. त्याच्याकडे त्याने नवीन गाडीची ट्रायल बघतो म्हणून मागून घेतली. मित्र तुषारला तेथेच सोडून तो एकटाच नवीन मोटारसायकलवरून (एम एच ०९ बीटी ९०९०) सुसाट सायबर चौकाच्या दिशेने गेला. यावेळी सम्राटनगर ते सायबर चौक मेनरोडवरील मल्हार हायटर्स बिल्डिंगच्या समोर येताच भरधाव मोटारसायकलवरील ताबा सुटून ती जोरात दुभाजकास धडकली. यावेळी यशचे रस्त्यावर डोके आपटून त्याचा जागीच मृत्यू झाला. सायबर चौक मार्गावर नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ होती. या अपघातामुळे नागरिकांनी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेची माहिती समजताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशचा मृतदेह शववाहिकेतून सीपीआर रुग्णालयात हलविला. त्यानंतर मोटारसायकल बाजूला घेत या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सावंत अधिक तपास करीत आहेत. आई-वडिलांना धक्का क्लासला गेलेल्या मुलाच्या अपघाताची बातमी समजताच आई-वडिलांना मानसिक धक्का बसला. यशचे वडील सेवानिवृत्त सहायक फौजदार आहेत. त्यांना चार मुलींनंतर यश झाला होता. त्यामुळे तो सर्वांचा लाडका होता. त्याचे मित्र व नातेवाइकांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. पालकांनी मुलांना गतिमान वाहने देऊ नयेत. तरुणांनी वाहन चालविण्याचे योग्य ते प्रशिक्षण घेतले पाहिजे. - आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर.