शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘बिद्री’तील विजयही आत्मचिंतन करायला लावणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:04 IST

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी आणि वाढविलेले मतदान असतानाही ‘जाधव-आबिटकर’ पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मुसंडी के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या निवडणुकीत विधानसभेची बिजे पेरल्याने हा निकाल विधानसभेच्यादृष्टीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा आत्मविश्वास दुणावणारा ...

ठळक मुद्देविधानसभेसाठी आबिटकरांचा आत्मविश्वास दुणावला वाढीव सभासदांनी ‘के. पी.’ना तारले

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी आणि वाढविलेले मतदान असतानाही ‘जाधव-आबिटकर’ पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मुसंडी के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या निवडणुकीत विधानसभेची बिजे पेरल्याने हा निकाल विधानसभेच्यादृष्टीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा आत्मविश्वास दुणावणारा ठरला. विधानसभेची समीकरणे वेगळी असल्याने के. पी. पाटील यांना भक्कम बांधणी करून सामोरे जावे लागणार आहे.

‘बिद्री’साखर कारखाना राधानगरी-भुदरगड व कागल विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. येथील सत्तेवर विधासभेला ताकद मिळत असल्याने कारखाना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू असते. सत्तेसाठी पक्षीय झालर बाजूला सारून आजवर आघाड्या झाल्याचे आपण पाहतो.

राज्यात ‘भाजपत’ची सत्ता आल्यानंतर राज्य सरकारबरोबरच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सर्वप्रथम चौफेर टीका करून कोंडीत पकडण्याचे काम ‘राष्टÑवादी’चे आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ऊस दराच्या प्रश्नावरून या दोन्ही नेत्यांमधील टीकाटीप्पणी टोकाला पोहोचली होती.

मंत्री पाटील यांनी तर ‘राष्टÑवादी’ नव्हे, तर ‘भ्रष्टवादी’ अशा शब्दांत हिणवले होते. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येतील, याची शक्यताही नव्हती. मागील निवडणुकीत मतदान करू न शकलेले सुमारे पाच हजार व त्यानंतर वाढीव ४७०० मतदानांमुळे राष्टÑवादी स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाईल, अशी परिस्थिती होती.

‘बिद्री’कारखान्याचा विचार करायचा झाल्यास मूळ ‘भाजप’ची कारखाना कार्यक्षेत्रात फारशी ताकद नव्हती; पण ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार बजरंग देसाई, रणजितसिंह पाटील, विठ्ठलराव खोराटे ही मंडळी ‘भाजप’सोबत राहिल्याने त्यांचा दबाव गट तयार झाला. या मंडळींची ताकद पाहूनच के. पी. पाटील यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले आणि आघाडी झाली.

दिनकरराव जाधव, प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक यांनी निवडणुकीची तयारी केली होती; पण ताकदवान उमेदवारांचा शोध त्यांना शेवटपर्यंत राहिला. ऐनवेळी राष्टÑवादीतून आलेल्या चौघांना उमेदवारी देत पॅनेलमध्ये समतोल साधला. शेवटच्या टप्प्यात आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेला आक्रमक प्रचार, थेट चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ यांना केलेल्या टार्गेटमुळे विरोधी पॅनेलला मानसिक ताकद मिळालीच; पण त्याबरोबर कार्यकर्ते त्वेषाने कामाला लागले. त्याचा परिणामही निवडणुकीत दिसला.

चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, बजरंग देसाई, समरजितसिंह घाटगे, बाबासाहेब पाटील, प्रवीणसिंह पाटील, आदी मातब्बर मंडळी एका बाजूला असताना आमदार आबिटकर यांनी जुन्या-नव्या लोकांना सोबत घेत पॅनेलची बांधणी केली. आबिटकर यांच्या पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मजल के. पी. पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

कारखान्याच्या निवडणुकीत आबिटकरांचा पराभव झाला असला तरी आगामी विधानसभेच्यादृष्टीने त्यांचा आत्मविश्वास दुणावणार हे मात्र निश्चित आहे. या उलट के. पी. पाटील यांना हा विजय संयमाने पचवावा लागणार आहे. विधानसभेवेळी समीकरणे बदलणार आहेत. ‘बिद्री’सोबत असणाºया मंडळींची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्यांची वजाबाकी करूनच सावधगिरीने बांधणी करावी लागणार आहे.एक हजारापर्यंत मताधिक्यात घटमागील निवडणुकीतील मतदानास पात्र नसलेले पाच हजार व नवीन ४७०० असे ९७०० वाढीव मतदार, त्यात के. पी. पाटील यांनी ११ वर्षांत केलेला करभाराचा अभ्यास करता राष्टÑवादी-भाजपचे पॅनेल किमान आठ हजारांच्या मताधिक्याने विजयी होणे अपेक्षित होते. उत्पादक गटातील चार ठिकाणी सरासरी ३३००, तर गट क्रमांक १ व ६ मध्ये ते एक हजारांवर मताधिक्य खाली आहे.