शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बिडकरांचे निसर्गचित्र प्रदर्शन खुले

By admin | Updated: March 27, 2017 00:34 IST

रसिकांची गर्दी : कलाविश्वातील मान्यवरांना बिडकर प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार

कोल्हापूर : सिनेकला दिग्दर्शक चित्रकार कै. बळिराम बिडकर व ज्येष्ठ चित्रकार रमेश बिडकर या पिता-पुत्रांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाला रविवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशीच कलारसिकांची प्रदर्शन पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सिनेकला दिग्दर्शक चित्रकार कै. बळिराम बिडकर कलाप्रतिष्ठानतर्फे आज, रविवार ते शनिवार (दि. १) या कालावधीत कै. बळिराम बिडकर आणि रमेश बिडकर यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.प्रदर्शनाचे उद्घाटन सायंकाळी ४.४५ वा. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे माजी प्राचार्य शिवाजी शर्मा, चित्रकार संजीव संकपाळ, सिनेअभिनेते जयकुमार परूळेकर, प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश बिडकर, अध्यक्ष के. आर. कुंभार, कार्यवाहक शिल्पकार अतुल डाके यांची प्रमुख उपस्थिती होती.चित्रप्रदर्शनात बिडकर पिता-पुत्रांची सुमारे ३५ चित्रे आहेत. यामध्ये कै. बळिराम बिडकर यांनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर ठिकाणी काढलेल्या २८ चित्रांचा, तर रमेश बिडकर यांनी चित्रबद्ध केलेल्या सात चित्रांचा समावेश आहे. जलरंगातून साकारलेले हे निसर्गचित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी सायंकाळनंतर कलारसिकांची एकच गर्दी झाली होती. शनिवार (दि.१) पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.दरम्यान, प्रतिष्ठानतर्फे चित्रपटक्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले सिनेअभिनेते मास्टर अबू, ज्येष्ठ चित्रकार जे. बी. सुतार, चित्रकार कला अध्यापक प्रा. सत्यजित वरेकर (सांगली) आणि नागेश हंकारे (कोल्हापूर) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.