शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कुमठेत भोंदू महिलेचा पर्दाफाश

By admin | Updated: June 4, 2015 00:02 IST

अंनिस-पोलिसांची कारवाई : महाराष्ट्र-कर्नाटकात जाळे; भाविकांची लुबाडणूक

तासगाव : करणी, भूतबाधा, सातीआसरा यासारखे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अघोरी प्रकार करणाऱ्या कुमठे (ता. तासगाव) येथील मंगल पांडुरंग बडेकर (वय ६२) या भोंदू महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि तासगाव पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. या महिलेच्या कारनाम्यांचे जाळे महाराष्ट्रासह कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात असून, तिच्याकडे येणाऱ्या लोकांची हजारापासून पाच हजार रुपयांपर्यंत लुबाडणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.कुमठे येथील मंगल बडेकर ही महिला देवीच्या नावाच्या आधारे अंधश्रद्धा पसरविणारे उपाय करते व त्यासाठी ती पैसे घेत असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे आली होती. त्याची दखल घेत समितीच्या कार्यकर्त्यांनी भाविक म्हणून या महिलेशी संपर्क साधला. प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी तिच्या घरी मोठा दरबार भरतो. या दरबारात जाऊन कार्यकर्त्यांनी मूल होत नाही, सासू त्रास देते, यावर उपाय सांगा, अशी विनवणी केली. त्यावर मंगल बडेकर हिने, सात शुक्रवार करा, परडी बांधून देईन, ती अमावास्येच्या रात्री नदीत सोडा. त्यासाठी अडीच हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. ‘मूल होण्यासाठी सातीआसराचे बंधन बांधून देईन, ते काढून देण्याची रक्कम नंतर सांगेन’, असेही तिने सांगितले. हे उपाय योजण्यासाठी बुधवारी भेटतो, असे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी तिला सांगितले होते. दरम्यान, तिच्याविरोधात तासगाव पोलिसांत ‘अंनिस’चे कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील, अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे, मधुकर पवार, प्रियांका तुपलोंढे, ज्योती अदाटे, जावेद पेंढारी, राणी कदम, पूर्ती पाटील यांनी तक्रार दिली. उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेतली. (पान १० वर)बडेकरच्या भाविकांचे मोठे जाळे करणी, लागीर, सातीआसरा काढणे यासारख्या अनेक गोष्टींचा व्यवसाय मंगल बडेकरकडून गेल्या आठ वर्षांपासून राजरोस सुरू आहे. त्यासाठी व्यक्ती पाहून हजार रुपयांपासून पुढे पैसे उकळण्याचा फंडा बडेकरने सुरू केला होता. महाराष्ट्रासह कर्नाटकातील लोकही मोठ्या प्रमाणात तिच्याकडे येत होते. भाविकांच्या घरी जाऊनही असे प्रकार ती करीत असे. बडेकरकडे येणाऱ्यांत गलाई बांधवांची संख्या मोठी होती. ही भोंदूगिरी चव्हाट्यावर आल्याने तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.