मोठमोठ्या क्षमतेच्या कास्टिंग उत्पादनात कौशल्य
भागीदारीमध्ये काम करताना उद्योजक रामप्रताप झंवर यांनी ऑईल इंजिनचे क्रँकशाफ्टसारखे विविध सहा सुटे भाग निर्मिती करून उद्योगाचा विस्तार केला. पुढे स्व:मालकीच्या उद्योगात त्यांनी मोठमोठ्या क्षमतेच्या कास्टिंग उत्पादनाचे कौशल्य आत्मसात करून देशासह जगभरातील उद्योगक्षेत्रामध्ये भरारी घेतली. त्यांनी स्वत: एका ग्रायडिंगची निर्मिती केली होती. त्यांनी उद्योग क्षेत्रातील नवतंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी जपानमधील मिटुटोया कंपनीला भेट दिली होती. बगदाद (इराक) मधील औद्योगिक प्रदर्शनामध्येदेखील ते सहभागी झाले होते.
फोटो (१४०६२०२१-कोल-रामप्रताप झंवर ०१) : ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर आणि पत्नी केशर झंवर.
फोटो (१४०६२०२१-कोल-रामप्रताप झंवर ०२) : ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये ‘झंवर हॉल’चे उद्घाटन करण्यात आले.
फोटो (१४०६२०२१-कोल-रामप्रताप झंवर ०३) : उद्योजक रामप्रताप झंवर यांनी उद्योगक्षेत्रातील पहिला पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक वसंतराव घाटगे यांच्या हस्ते स्वीकारला होता.
फोटो (१४०६२०२१-कोल-रामप्रताप झंवर ०४) : उद्योजक रामप्रताप झंवर यांनी स्वत: ग्राइडिंग मशीनचे डिझाईन केले होते. त्याचे पूजन केशर झंवर यांच्या हस्ते करण्यात आले होते.
फोटो (१४०६२०२१-कोल-रामप्रताप झंवर ०५) : उद्योग, व्यवसायाच्या प्रश्नांबाबत माजी केंद्रीय अर्थमंत्री मनमोहनसिंग यांची कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शिवाजीराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सन १९९४ मध्ये भेट घेतली होती. या शिष्टमंडळात रामप्रताप झंवर यांच्यासमवेत प्रदीपभाई कापडिया, राम मेनन यांचा समावेश होता.