शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

भटजी, देव, शपथ अन् काळ्या बाहुलीचा फंडा

By admin | Updated: October 31, 2015 00:08 IST

जवळपास सर्वच प्रभागांत वाटप सुरू

कोल्हापूर : प्रभागात ‘दौलत’ नसली तरी शहरातील त्या परिसराचे नाव मात्र तेच आहे. महापालिका निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी या प्रभागात अजब फंडा वापरण्यात येत आहे. त्या परिसरातील काही नागरिकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या प्रभागात तब्बल सात उमेदवार रिंंगणात आहेत. प्रचार आज, शुक्रवारी संपत असल्याने आता उमेदवारांनी छुप्या प्रचारासह थेट पैसे वाटण्यास सुरुवात केली आहे. प्रभागातील दोन-तीन तरी उमेदवार पैसे देत आहेत. मतदारही तयारीचे असल्याने सगळ्याच उमेदवारांकडून पैसे घेत आहेत. त्यामुळे पैसे देऊनही मतदान फुटू नये, यासाठी एका उमेदवाराने पैसे देण्यासाठी थेट अंधश्रद्धेचाच आधार घेत एका भटजीची मदत घेतली आहे. पैसे द्यायला जाताना सोबत भटजीला नेण्यात येत आहे. मतदारांच्या घरात जाऊन त्यांना तुमचे कुलदैवत कोणते म्हणून विचारण्यात येते. त्यांचे कुलदैवत जोतिबा असेल तर जोतिबाचा फोटो घेऊन, त्यावर गुलाल टाकून मतदारांकडून ‘मी तुम्हालाच मतदान करतो’ म्हणून शपथ घेतली जाते. जोतिबाचा गुलाल फोटो, पैसे व त्या मतदारांनाही लावला जातो. शेजारी मतदारांना भीती वाटावी म्हणून काळी बाहुलीही ठेवली जाते. सरासरी एका मताला एक हजार रुपये असा सर्रास दर आहे. ज्यांनी एक हजार रुपये दिले, त्यांच्या विरोधातील उमेदवार दीड हजार देत आहे. लोकही स्वत:हून चालत आलेली लक्ष्मी नाकारायची कशी, म्हणून हात धुऊन घेत आहेत.जवळपास सर्वच प्रभागांत वाटप सुरूपैसे वाटण्याचा प्रकार अपवाद वगळता बहुतांश सर्वच प्रभागांत सुरू झाला आहे. काहींनी बुधवारीच (दि. २८) त्याची सुरुवात केली. पहिल्यांदा आपण पैसे दिले की काही मतदार असे असतात की, ज्यांच्याकडून आपण पहिल्यांदा पैसे घेतले त्यांच्याशी ते प्रामाणिक राहतात, असे त्यांना वाटते. शिवाय विरोधी उमेदवाराने जास्त पैसे दिले तर आपल्यालाही तेवढे द्यावे लागू नयेत, यासाठी आपणच अगोदर पैसे देऊन मोकळे झालेले बरे, असा व्यवहार त्यामागे असतो.