शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतनिर्माण’चे दप्तर सापडले शौचालयात

By admin | Updated: January 13, 2016 00:34 IST

चंदूर येथील प्रकार : झेरॉक्स प्रती सापडल्या, मूळ कागदपत्रे अद्याप गायबच

इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील भारतनिर्माण नळ पाणीपुरवठा योजनेच्या गहाळ झालेल्या दप्तराच्या झेरॉक्स प्रती सोमवारी या योजनेच्या ठिकाणी असलेल्या शौचालयात सापडल्या. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पंचांसक्षम सदरचे दप्तर ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा केला. मात्र, ओरिजनल दप्तर, बॅँक पासबुक, चेकबुक कोठे गहाळ झाले आहे? हे अद्याप समजले नाही.चंदूर येथे २००७ साली सुमारे पावणेचार कोटी रुपयांची भारतनिर्माण नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. अतिशय संथगतीने या योजनेचे काम सुरू असून, अद्याप संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही. तसेच योजनेतील कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सत्तांतर झाले. नवीन पदाधिकाऱ्यांनी भारतनिर्माण योजनेची समिती विशेष सभा घेऊन बदलली. त्यामुळे माजी अध्यक्ष महेश पाटील यांच्याकडे ग्रामपंचायतीच्यावतीने सदर योजनेच्या दप्तराची मागणी केली. त्यावेळी त्यांनी दप्तर आपल्याकडे नसल्याचे सांगितले. म्हणून नूतन अध्यक्ष राजेंद्र पाटील व सरपंच विजय पाटील यांनी योजनेचे दप्तर गहाळ झाले असून, संबंधित माजी अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई करून दप्तर मिळवून द्यावे, अशी तक्रार जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे केली. दरम्यान, योजनेचे दप्तर योजनेच्या ठिकाणी असलेल्या शौचालयात असल्याचे पदाधिकाऱ्यांना समजले. मात्र, परस्पर दप्तर काढून घेतल्यास त्यातील कागदपत्रे गहाळ केल्याचा आरोप होईल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी याबाबत पंचायत समितीला कळवून तेथील अधिकाऱ्यांमार्फत सदरचे दप्तर काढून त्याचा पंचनामा केला. यामध्ये संबंधित योजनेच्या काही फायली आढळल्या. मात्र, त्यामधील कागदपत्रे झेरॉक्स प्रतीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पंचनामा करण्यात आला. विस्तार अधिकारी एच. एन. खाडे, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कनिष्ट अभियंता एस. बी. पाटील, ग्रामविकास अधिकारी आर. बी. जाधव, सरपंच विजय पाटील, पाणीपुरवठा अध्यक्ष राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील, कल्लेश्वर वाघमोडे, शिवगोंडा पाटील, आदींसह उपस्थित होते. (वार्ताहर)