शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचे लाभ फक्त कागदावर

By admin | Updated: September 23, 2014 00:48 IST

कामगार नेत्यांचा सूर : बांधकाम कामगार मेळाव्यात विविध प्रश्नांवर चर्चा

कोल्हापूर : बांधकाम क्षेत्रामधील विविध योजनेतील मिळणारे लाभ फक्तमहाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या कागदावरच आहेत. मात्र, प्रत्यक्षात योजनेचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नसून त्यासाठी आंदोलन करण्याची आवश्यकता आहे, असा सूर आज, सोमवारी निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या (आयटक) मेळाव्यात उमटला. संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी मेळाव्याचे अध्यक्षस्थानी होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात माजी प्राचार्य नरहर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. शंकर पुजारी यांनी, महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळ अकार्यक्षम असल्यामुळे कामगारांना समाधानकारक लाभ मिळत नाहीत. कर्नाटकमध्ये शासन बांधकाम कामगारांना त्यांची घरे बांधण्यासाठी कर्ज देते. पण, महाराष्ट्रामध्ये कर्ज मिळत नाही. सध्या महागाईमुळे कामगार मेटाकुटीला आला आहे. त्यांना दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्डवर पूर्वी ३५ किलो धान्य पाच ते सहा रुपयांनी मिळत होते, असे सांगत कामगारांवर तमिळनाडू ३४०० कोटी रुपये खर्च करते. तसेच छत्तीसगड एक हजार कोटींची सबसिडी देऊन कामगारांचे जीवनमान उंचावते. बिहारमध्ये कामगारांना आवश्यक वस्तू घेण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये देते. महाराष्ट्रात फक्त तीन हजार रुपये देते; पण गत तीन महिन्यांपासून फक्त २० टक्के कामगारांनाच कामगार आयुक्त, कोल्हापुरातील कार्यालयाकडून हे पैसे मिळाले असल्याचे समजते. राज्य शासन सर्वांत जास्त आरोग्य व शिक्षणावर खर्च करते. त्यामुळे कामगारांना सरकारने पेन्शन सुरू करावी. माजी प्राचार्य नरहर कुलकर्णी म्हणाले, कोल्हापुरातील आर्किटेक्चर व बिल्डर्सनी बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले पाहिजे. सेके्रटरी विजय बचाटे यांनी, आचारसंहिता सुरू असली तरी बांधकाम कामगारांची नोंदणी संघटनेमार्फत सुरू आहे. ३१ आॅगस्टपूर्वी महाराष्ट्र कल्याणकारी मंडळाकडे नोंंदणी केलेल्या कामगारांचे तीन हजार रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)