शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

महापूरबाधित शेतकऱ्यांनाही व्याज सवलतीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टी व महापुरातील बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टी व महापुरातील बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देणार नसल्याचे शासनाने सांगितले होते. कर्जमाफीच्या वरील रकमेची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीची सोमवारी बैठक झाली. यामध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. महापुरातील बाधित ९२ हजार २०१ शेतकऱ्यांना २६८ कोटींची कर्जमाफी राज्य शासनाने दिली आहे. या कर्जमाफी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे सरकारने जाहीर केले होते. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी योजनेचा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी उर्वरित पीक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड केली होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रोत्साहनपर तीन टक्के व्याज परतावा योजनेप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देणे आवश्यक असल्याबाबत बँकेच्या ३१ ऑक्टोबर २०२० च्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव केला होता. त्याचबरोबर सर्वसाधारण सभेतही याबाबत ठराव झाला होता. बँकेच्या पाठपुराव्यानंतर सरकारने अंशत: कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे.