शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात लवकर खंडपीठ करा - संजय मंडलिक यांची संसदेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:47 IST

कोल्हापूरचे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही या मागणीकरिता संसदेमध्ये व संसदेबाहेर आवाज उठविला असल्याचा उल्लेख करून केंद्र शासनाच्या जसवंत समिती व मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती मोहीत शहा यांनी कोल्हापूर येथेच खंडपीठ व्हावे, असा सकारात्मक अहवाल दिल्याचे मंडलिक यांनी निदर्शनास आणून दिले.

ठळक मुद्देयासाठी निवेदन दिले असल्याचे सांगून पक्षकारांच्या सोईकरिता कमी वेळेत व कमी खर्चात न्याय या धोरणानुसार हे खंडपीठ व्हावे, अशी मागणी मंडलिक यांनी केली आहे.

कोल्हापूर : मुंबई हायकोर्ट अंतर्गत सध्या ६५ हजारांच्या आसपास दावे प्रलंबित असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. तेव्हा कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी संसदेत केली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर या सहा जिल्ह्यांचे मुंबई हायकोर्टपर्यंतचे अंतर हे ६00 कि. मी. ते ७५0 कि. मी. इतके भरते. या जिल्ह्यांपैकी कोणत्याही एका पक्षकारास मुंबई येथे जावयाचे झाल्यास एका तारखेकरिता एका व्यक्तीस सुमारे पाच ते सहा हजार रुपये इतका खर्च होतो. हा खर्च सर्वसामान्य पक्षकारांना न परवडणारा असा असल्यामुळे कोल्हापूर येथे लवकरात लवकर खंडपीठ व्हावे, असे मंडलिक म्हणाले.कोल्हापूरचे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही या मागणीकरिता संसदेमध्ये व संसदेबाहेर आवाज उठविला असल्याचा उल्लेख करून केंद्र शासनाच्या जसवंत समिती व मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती मोहीत शहा यांनी कोल्हापूर येथेच खंडपीठ व्हावे, असा सकारात्मक अहवाल दिल्याचे मंडलिक यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच १९ जानेवारी २0१९ रोजी मुख्य न्यायमूर्तींकडे महाराष्ट्र शासनानेदेखील कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी निवेदन दिले असल्याचे सांगून पक्षकारांच्या सोईकरिता कमी वेळेत व कमी खर्चात न्याय या धोरणानुसार हे खंडपीठ व्हावे, अशी मागणी मंडलिक यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिल