शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘खंडपीठ’ हाच केंद्रबिंदू

By admin | Updated: June 13, 2017 00:20 IST

बार असोसिएशन निवडणूक : उद्या मतदान, निकाल; २८ उमेदवार रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या २०१७-१८ या वर्षीच्या कार्यकारिणीसाठी अ‍ॅड. पीटर बारदेस्कर विरुद्ध अ‍ॅड. प्रशांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये निवडणूक दुरंगी व चुरशीची होत आहे. एकूण १४ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात असून, उद्या, बुधवारी (दि. १४) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान व त्यानंतर मतमोजणी, निकाल जाहीर केला जाणार आहे. गेल्या वर्षी निवडणुकीततिरंगी लढत झाली होती, पण यंदा ही निवडणूक दुरंगी असल्यामुळे पॅनेल टू पॅनेल मतदान होण्याची दाट शक्यता आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, जॉर्इंट सेक्रेटरी, महिला प्रतिनिधी, लोकल आॅडिटर यासह नऊ कार्यकारिणी सदस्य अशा १४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महिला प्रतिनिधीपदी अ‍ॅड. शिंदे पॅनेलच्या आसावरी अभिजित कुलकर्णी यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. सुमारे १५६५ मतदार पात्र आहेत. दोन्हीही पॅनेलप्रमुखांनी ‘खंडपीठ’ हाच प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. कोल्हापूर शहरात सुमारे ४० तसेच जिल्ह्यात एकूण ८५ न्यायालये आहेत. या न्यायालयातील पात्र वकिलांना मतदानाचा अधिकार आहे. गेल्या चार दिवसांत शहरासह तालुकास्तरावरील न्यायालयात जाऊन दोन्ही पॅनेलप्रमुखांनी प्रचार केला आहे. आज, मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तर उद्या, बुधवारी मतदानानंतर सायंकाळी त्वरित मतमोजणी होऊन रात्री निकाल जाहीर केला जाणार आहे.‘खंडपीठ’ आंदोलनाची दिशा बदलणार गेल्या वर्षी खंडपीठासाठी आंदोलन करून हाती काहीच लागले नाही. त्यामुळे सहा जिल्ह्यांतील वकिलांची मते आजमावून आंदोलनाची दिशा बदलण्याचा विचार सुरू असल्याचे मत अध्यक्षपदाचे उमेदवार व पॅनेलप्रमुख अ‍ॅड. प्रशांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. सर्किट बेंचचा प्रश्न सोडविण्यावर अधिक प्रमाणात भर देणार आहे. या आंदोलनापासून अनेक ज्येष्ठ वकील अलिप्त आहेत, त्यांनाही आंदोलनाच्या मुख्य प्रवाहात आणणार आहे. याशिवाय युवा वकिलासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.खंडपीठ लढाई रस्त्यावर आणणार नागरिकांच्या सहभागाने खंडपीठासाठी रस्त्यावर लढाई लढणार असून, त्यामध्ये सहा जिल्ह्यांतील वकिलांसह सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीचा सहभागवाढीसाठी भर देणार असल्याचे अध्यक्षपदाचे उमेदवार व पॅनेलप्रमुख अ‍ॅड. पीटर बारदेस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. न्यायाधीश आणि वकील यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यासाठी दोन्हीही घटकांत समन्वय साधणारा कृतिबद्ध कार्यक्रम राबविणार आहे. अत्याधुनिक लायब्ररी, तज्ज्ञांची व्याख्याने, मार्गदर्शन शिबिरे भरवणार, तालुकास्तरीय बार सक्षमीकरणासाठी फर्निचर, पुस्तके उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.