शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका ‘वॉररूम’तर्फे दीड हजार रुग्णांना बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST

कोल्हापूर : महापालिकेच्या वॉररूममधून शहरातील व ग्रामीण भागातील दीड हजार काेरोनाबाधित नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये ...

कोल्हापूर : महापालिकेच्या वॉररूममधून शहरातील व ग्रामीण भागातील दीड हजार काेरोनाबाधित नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयांसह कोरोना केअर सेंटरमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन बेडचाही समावेश आहे. यावरूनच या वॉररूमची उपयुक्तता सिद्ध झाली.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्‍याने रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे रुग्णांना बेडसाठी विविध रुग्णालयांत फिरायला लागू नये, त्यांना तत्काळ बेड मिळावेत म्हणून महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने दि. ७ एप्रिलपासून वॉररूम सुरू केली आहे. शहरातील नागरिकांना सरकारी व खासगी रुग्णालयातील रिक्त बेडची माहिती येथे २४ तास उपलब्ध होते. ही सुविधा कोरोना रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. एका फोनवर त्यांना शिल्लक बेडची माहिती मिळत आहे. यामुळे वेळेवर उपचार होत असल्याने कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी हा विभाग एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.

कोल्हापूरसह पुणे, मुंबई, कर्नाटकवरूनही फोन येत आहेत. वॉररूममध्ये आजपर्यंत दोन हजार नागरिकांनी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड व हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी बेड उपलब्धतेसाठी संपर्क साधला आहे. यापैकी सरकारी व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये तसेच कोविड काळजी केंद्र यांच्याबद्दल बेड उपलब्धतेची माहिती दिली गेली.

-ऑक्सिजन सिलिंडरचाही पुरवठा-

महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्या मदतीने दहा साखर कारखान्यांकडून त्यांच्याकडील ८० ऑक्सिजन सिलिंडर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत अधिग्रहित केली आहेत. खासगी अथवा सरकारी रुग्णालयांकडील ऑक्सिजनचा साठा कमी पडल्याची माहिती वॉररूमकडे प्राप्त होते. यावेळी तातडीने या दवाखान्यांना त्यांचा साठा येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजनची सिलिंडर दिली जातात.

- वॉररूमची अशीही सामाजिक बांधीलकी-

ग्रामीण भागातील एक गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिला शहरात कोठेही दाखल करून घेतले जात नव्हते. ती शहरातील एका हॉस्पिटलच्या दारात सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत गेटवर दाखल होण्यासाठी थांबली होती. परंतु, तेथेही दाखल करून घेतले नाही. त्या महिलेच्या नातेवाइकांनी महापालिकेच्या वॉररूमला बेड पाहिजे असल्याचे कळविले. तातडीने महापालिकेच्या पथकाने त्या महिलेला खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिला. महिलेची प्रसूती होईपर्यंत महापालिकेचे पथक तेथून बाहेर पडले नाही. सध्या महिला कोरोनामुक्त असून, तिचे नवजात बाळही सुखरूप आहे.

वॉररूम फोन नंबर्स

०२३१- २५४५४७३ आणि ०२३१ - २५४२६०१. या नंबरवर संपर्क केल्यास कोणत्या रुग्णालयामध्ये कोविड उपचारासाठी बेड उपलब्ध आहेत याची माहिती दिली जाते.