शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाविसर्जन तिसऱ्या दिवशीच व्हाव

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

पंचगंगा घाटावर गर्दी : खेडी पुढे.. कोल्हापूर मागे; धार्मिक पगड्याचा परिणामे

संतोष पाटील - कोल्हापूर -पुरोगामी कोल्हापूरकरांनी आपल्या आप्तस्वकियांचा शेवटचा विधी शेणी-लाकडात पूर्ण व्हावा, अशी भूमिका घेत डिझेल दाहिनीकडे पाठ फिरविली आहे. ३७ बेडची क्षमता असलेल्या पंचगंगा घाटावरील स्मशानभूमीत रोज सरासरी १५ मृतदेह येतात. त्यातच मंगळवार, शुुक्रवार व शनिवार या दिवशी धार्मिक पगड्यामुळे शहरवासीय रक्षाविसर्जनाचा विधी करीत नाहीत.अनेकवेळा दोन बेडच्या मध्ये दहनविधी केला जातो. खेडोपाडी अमावास्या वगळता येणाऱ्या तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जनाचा विधी करत आहेत, त्याप्रमाणे शहरवासीयांनीही अमावास्या वगळून तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन विधी करण्याची गरज आहे. मानसिकता बदलून स्मशानभूमीतील गर्दी कमी करण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रक्षाविसर्जनानंतर रक्षाकुंडात रक्षा गोळा करुन ती उद्यानांना पुरविण्याचे पहिले पाऊल कोल्हापुरातच पडले. त्याशिवाय रक्षाविसर्जन, बाराव्याची प्रथा यासंबंधी अनेक चांगले पायंडे कोल्हापूरने पाडले आहेत. त्यामुळे रक्षाविसर्जनाला पुन्हा लोकांनी ‘मुहूर्त’ पाहू नये असे जाणकारांचे म्हणणे आहे. कोणत्या दिवशी जन्म घ्यावा हे जसे कुणाच्या हातात नसते तसेच मृत्यू कोणत्या दिवशी यावा हेदेखील त्याच्या हातात नसते. त्यामुळे मृत्यूनंतर पुन्हा पंचांग, मुहूर्त, कोष्टक या गोष्टीतून आता बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूरकर मंगळवार व शुक्रवार हा अंबाबाईचा वार, तर शनिवार हा हनुमानाचा दिवस म्हणून यादिवशी रक्षाविसर्जन करीत नाहीत. पंचगंगा स्मशानभूमीची ३७ बेडची क्षमता असून, रोज सरासरी १५, तर आॅगस्ट ते जानेवारी याकाळात रोज सरासरी २५ दहनविधी येथे होतात. मात्र, रक्षाविसर्जन विधी लांबल्याने स्मशानभूमीत गर्दी होते. काही वेळेला तिथे पाय ठेवायलाही जागा नसते. अनेकवेळा दोन बेडच्या मध्ये अडगळीत अंत्यविधी उरकला जातो. त्यामुळे कोल्हापूरकरांनी मानसिकतेत बदल करून निधनाच्या तिसऱ्या दिवशीच रक्षाविसर्जन करण्याची गरज आहे. जेणेकरून कोणासही आप्तस्वकियांचे अडगळीच्या जागेत दहन करावे लागणार नाही.प्रत्येक दिवस व वाराचे महत्त्व वेगळे आहे. धार्मिक विधी करण्यास कशाचीही आडकाठी नसते. गरज आहे ती फक्त परंपरेला प्रश्न विचारून स्वत: बदलण्याची. परंपरेवर आधारित चालत आलेल्या धार्मिक विधीला छेद देत विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारण्यास हरकत नाही. - रामदास पाटील(सत्यशोधक समाज अभ्यासक)डिझेल दाहिनीकडे पाठप्रत्येक दहनविधीसाठी ४०० ते ५०० शेणी व १२० किलो लाकडे महापालिका मोफत पुरविते. दरवर्षी शहरात साडेतीन ते चार हजार दहनविधी होतात. दरवर्षी पाचशे टन लाकू ड व पाच लाखांच्या शेणी खरेदी केल्या जातात. पंधरा लाख रुपये खर्च करूनही महापालिका दहनविधीसाठी कसलाही मोबदला आकारत नाही. दरम्यान, महापालिकेने परंपरेला छेद देत पर्यावरणपूरक डिझेल दाहिनीची २० वर्षांपूर्वी खरेदी केली. चार तासांत दहन पूर्ण होऊन किलो-सव्वा किलोचा हाडांचा चुरा नातेवाइकांना विधीसाठी मिळतो. पारंपरिक दहनविधीपेक्षा डिझेल किंवा विद्युत दाहिनीचा खर्च कमी आहे. होणारे प्रदूषणही ९५ टक्क्यांनी कमी होते. मात्र, आप्तस्वकियांच्या धार्मिक अंत्यविधीला फाटा देण्याची मानसिकता कोल्हापूरकरांनी कधी दाखविलीच नाही. पुढाकार कोण घेणार...आता एखाद्याचे निधन झाल्याचे वृत्त माध्यमांमुळे काही क्षणात सगळ््यांना समजते. त्यातही लांबच्या पाहुण्यांना समजण्यासाठी दुसरा दिवस असतो. त्यामुळे तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन करणे सोयीचेच असते. परंतु असा नवा पायंडा पाडायचा झाल्यास अखिल भारतीय मराठा महासंघ किंवा तत्सम संस्था-संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. महापालिकाही ठराव करून तसे सुचवू शकते. पण सगळ््यांच्या सहमतीनेच त्याबाबतचा निर्णय व्हायला हवा.कोल्हापूरकरांनी नेहमीच बदल स्वीकारला आहे. काळानुरूप बदलत रक्षाविसर्जनाबाबतही जागरूकता दाखविणे महत्त्वाचे आहे. तीन-चार दिवस रक्षाविसर्जन पुढे गेल्याने स्मशानभूमीत गर्दी होते. अमावास्या वगळता तिसऱ्या दिवशीच रक्षाविसर्जनाची प्रथा शहरवासीयांनी अवलंबावी. -दीपक पोलादे (सामाजिक कार्यकर्ते)