शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने एकही मृत्यू होणार नाही याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST

कोल्हापूर : लसीकरणात कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर आहे, कोरोनामुक्तीतदेखील जिल्हा अग्रेसर रहावा यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, काेरोनाने ...

कोल्हापूर : लसीकरणात कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर आहे, कोरोनामुक्तीतदेखील जिल्हा अग्रेसर रहावा यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, काेरोनाने एकही मृत्यू होणार नाही यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केले. ग्रामपंचायतीने सादर केलेल्या आराखड्यातील एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सर्व प्रभाग समिती, ग्रामसमिती अध्यक्ष, प्रभाग व ग्राम समित्यांचे सर्व सदस्य, सचिव, ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी त्यांनी वेबिनारद्वारे संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासनातर्फे प्रत्येक गावात, मनपा क्षेत्रात ‘महा-ई-सर्व्हे’ सुरू करण्यात आला असून याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. कोरोना रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले असून या कामात नागरिकांनी उत्स्फूर्त साथ द्यावी.

माणगावचे राजू मगदूम, वडणगेचे सचिन चौगुले, कवठेसादच्या दीपाली भोकरे आणि बेळगुंदीचे सरपंच तानाजी रानगे यांनी कोरोनाला गावाच्या वेशीवर थोपविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपायांची माहिती दिली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले.

--

ज्येष्ठांसाठी १९ हजार लसी

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात ६० वर्षांपुढील ५४ टक्के नागरिकांचे मृत्यू हे लसीकरणाअभावी झाले आहेत. त्यामुळे या नागरिकांनी लसीकरणाला न घाबरता लस घ्यावी. त्यासाठी सुमारे १९ हजार लसी मिळाल्या आहेत. ज्येष्ठांपैकी नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येईल.

--

कारवाईसाठी ९ वाहने

अधिक वेळ दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकानदारांवर व ग्रामीण भागात मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाकडे नऊ वाहने दाखल झाली असून ही वाहने जिल्ह्यात सर्वत्र फिरून कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

---

फोटो काले डेस्कला कोरोना आढावा बैठक नावाने पाठवला आहे.

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयातून गुरुवारी झालेल्या वेबिनारमध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ग्रामपंचायतींना कोरोना उपाययोजनांबद्दल सूचना दिल्या.

---