शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

बांबवडे पशुवैद्यकीय रुग्णालयात गैरसोयी

By admin | Updated: July 14, 2014 01:11 IST

सुविधांचा अभाव : पशुवैद्यकीय अधिकारी नाही

रामचंद्र पाटील - बांबवडेदहा हजारांपेक्षा जास्त पशुधनाच्या उपचारासाठी असलेल्या बांबवडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांच्या कमतरतेसह इतरही सुविधांचा अभाव असल्याने हा दवाखानाच व्हेंटिलेटरवर आल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांना वालीच राहिलेला नाही.पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत २००५ सालापासून तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय शाहूवाडी हा दवाखाना बांबवडे येथे कार्यरत आहे. या अगोदर येथे जिल्हा परिषदेचा दवाखाना होता. त्यामध्ये जनावरांना उपचार करताना मर्यादा येत होत्या. जनावरांचे गंभीर आजार व शस्त्रक्रिया येथे होत नव्हत्या; परंतु ज्या गरजेच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध होत्या, त्या चांगल्या पद्धतीने होत होत्या.या दवाखान्याचे तालुका पशुवैद्यकीय केंद्रात रूपांतर झाले आणि दवाखाना सुरू झाल्यापासून तो नेहमीच समस्येच्या विळख्यात सापडला आहे. तालुक्यासाठी असणारे हे पशुचिकित्सालय जागेच्याअभावी मध्यवर्ती ठिकाण म्हणून बांबवडे येथे घेण्यात आले. या परिसरातील १७ गावे व त्याच्या दुप्पट वाड्या, वस्त्या असे याचे कार्यक्षेत्र आहे. येथे नवीन इमारत, निवासस्थान यासाठी १.५ कोटींची योजना शासनाच्या लालफितीत अडकून पडली आहे. आता येथे जी इमारत आहे ती पूर्वी धर्मशाळा म्हणून वापरात आणली जायची. त्यानंतर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र काही काळ सुरू होते. आता दोन दशकांहून अधिक काळ येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे. एकूण ३० गुंठे जागा सातबाऱ्यावर नोंद आहे. प्रत्यक्षात ती आता निम्मीसुद्धा भरत नाही. इमारतीची पडझड झाली आहे. रिकामी जागा खासगी वडापच्या वाहनांचा तळच बनला आहे. दवाखान्याची अशी स्थिती पाहून नवीन इमारत त्यामध्ये प्रयोगशाळा, सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग, स्वतंत्र निवासस्थान असे मोठे रुग्णालय येथे उभारण्यासाठीचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे लालफितीत आजही अडकून पडला आहे. स्थानिक प्रशासन यासाठी प्रयत्नशील असले तरी त्यांना वरील पातळीवर मदतीची गरज आहे; परंतु सध्या उपलब्ध सुविधा आहेत त्याही शेतकऱ्यांना डॉक्टरांअभावी मिळू शकत नाहीत.