शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे बँकांचे कामकाज ठप्प

By admin | Updated: July 30, 2016 00:32 IST

१५०० कोटींची उलाढाल थांबली : खासगीकरणाविरोधात अधिकारी, कर्मचाऱ्यांची निदर्शने

कोल्हापूर : देशातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या एकत्रीकरण व खासगीकरणाविरोधात शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकांच्या ३५० शाखांनी बंद पाळला. ‘युनायटेड फोरम आॅफ बँक्स युनियन’च्या (यूएफबीयू) नेतृत्वाखालील बंदमध्ये अडीच हजार अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. या बंदमुळे धनादेश वटविणे, पैसे भरणे-काढणे, आदी स्वरूपांतील सुमारे १५०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. बँकिंग क्षेत्रात केंद्र सरकार करीत असलेले बदल जनविरोधी असल्याचा आरोप करीत ‘यूएफबीयू’ने या ‘बंद’ची हाक दिली. यूएफबीयूसह आॅल इंडिया बँक आॅफ इंडिया आॅफिसर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सभासद व विविध बँकांच्या शाखांमधील अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता लक्ष्मीपुरीतील बँक आॅफ इंडियाच्या कार्यालयासमोर जमले. याठिकाणी त्यांनी ‘बँकांचे एकत्रीकरण रद्द करा, रद्द करा’, ‘बोल मजुरा, हल्ला बोल, हल्ला बोल’ अशा घोषणा देत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. यानंतरच्या निषेध सभेत आॅफिसर्स असोसिएशनचे संयुक्त महासचिव अशोक चौगुले आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहन चोडणकर बँक आॅफ इंडियाचे चंद्रकांत गुडसकर, सिंडिकेट बँकेचे मकरंद करंदीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एम्प्लॉईज असोसिएशनचे जिल्हा सचिव विकास देसाई, रमेश कांबळे, संजय उलपे, सुरेश चिंदरकर, सूर्यकांत कर्णिक, आदी उपस्थित होते. चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा‘यूएफबीयू’च्या नेतृत्वाखालील बँकांच्या ‘बंद’मध्ये आॅल इंडिया बँक आॅफिसर्स कॉन्फडरेशन, आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल कॉन्फडरेशन आॅफ बँक एम्प्लॉईज, नॅशनल बँक आॅफिसर्स आॅर्गनायझेशन अशा विविध नऊ संघटना सहभागी झाल्याचे आॅफिसर्स असोसिएशनचे संयुक्त महासचिव अशोक चौगुले यांनी सांगितले. आॅफिसर्स असोसिएशनची दि. ९ आॅगस्टला दिल्लीत बैठक होणार आहे. त्यातील चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल.