शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सोमवारपासून बंदी आदेश जारी

By admin | Updated: July 26, 2014 00:45 IST

शहरातील टोलविरोधी आंदोलन, रमजान ईद, अण्णा भाऊ साठे जयंती व श्री जोतिबा श्रावणषष्ठी यात्रा, इत्यादी सण तसेच इतर पक्ष, संघटनांच्यावतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनांच्या अनुषंगाने

कोल्हापूर : शहरातील टोलविरोधी आंदोलन, रमजान ईद, अण्णा भाऊ साठे जयंती व श्री जोतिबा श्रावणषष्ठी यात्रा, इत्यादी सण तसेच इतर पक्ष, संघटनांच्यावतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनांच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७(३) अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरून जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी २८ जुलै रोजी पहाटे पाच वाजल्यापासून ते १० आॅगस्ट २०१४ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत खालीलप्रमाणेवर्तन करण्यास मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यत शस्त्रे किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर सहज फेकून त्यांचा मारण्यासाठी उपयोग करणे, व्यक्ती, अगर त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन आणि दहन करणे, सार्वजनिक घोषणा देणे, पाच अगर पाचांहून जादा व्यक्तींंनी एकत्र जमा होण्यास, जमाव जमण्यास, मिरवणुका काढणे व सभा घेणे, आदींसाठी मनाई करण्यात आली आहे. आदेशाच्या कालावधीत साजरे होणारे सर्व सण, उत्सव, जयंती, इत्यादीसाठी जमा होणारा जनसमुदायस हा मनाई आदेश लागू नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.