शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कागलमध्ये चाव्यांना बसणार मीटर

By admin | Updated: November 27, 2014 00:20 IST

अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना आळा बसणार

जहॉँगीर शेख - कागल -कागल नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील साडेसहा हजार चाव्यांना मीटर बसविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या योजनेमुळे पाण्याची आणि आर्थिक खर्चाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना आळा बसणार आहे.तेराव्या वित्त आयोगातून मंजुरी मिळून ही रक्कमही नगरपालिकेकडे वर्ग झाली आहे. कागल शहराला पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. शहराची ३८ हजार लोकसंख्या आहे. सध्या रोज ८३ लाख लिटर पाणी दिले जाते. हे प्रमाण माणसी २०० लिटर भरते. शासन नियमाप्रमाणे माणसी ७० लिटर पाणी देणे क्रमप्राप्त आहे. या भरघोस पाणी उपलब्धतेमुळे पाणी वापरावरही नियंत्रण राहात नाही. ५० टक्के चाव्यांना तोटीच नाहीत. त्यामुळे एकदा पाणीपुरवठा सुरू झाला की संपेपर्यंत हे पाणी सुरू असते. अनेकांनी या नळाच्या पाण्यावर घराजवळ भाजीपाला पिकविला आहे. तर एक चावी कनेक्शन घेऊन त्याचा पाणीपुरवठा भाडेकरूंना करण्यासाठी काहींनी थेट मोटारी बसवून पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या वार्षिक पाणीपट्टी १३३० रुपये आहे. शासनाने ही पाणीपट्टी १६१२ प्रमाणे घ्यावी, असे आदेश दिलेले आहेत. नळांना मीटर बसवून त्याप्रमाणे किती प्रमाणात पाणी वापरले, तितकेच बिल ग्राहकांना येणार असल्याने काटकसरीने पाणी वापरणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळणार आहे. तर अवैध मार्गाने पाणी वापर करणाऱ्यांना त्या प्रमाणात पालिकेकडे पैसे भरावे लागणार आहेत. जिल्ह्यात यापूर्वी काही नगरपालिकांमध्ये हा प्रयोग झाला आहे. मात्र यातील मीटर स्वत: ग्राहकांनी बसविले आहे. नळांना मीटर बसविण्यासाठी दीड कोटी रुपयांचा थेट निधी मंजूर होणारी कागल नगरपालिका जिल्ह्यात एकमेव आहे. आता याची अंमलबजावणी कशी होते? यावर या योजनेचे यश-अपयश अवलंबून आहे. उत्पन्न आणि खर्च....२०११-१२ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठा खर्च ८७ लाख, तर उत्पन्न केवळ ४० लाख रुपये असे चित्र होते. म्हणजे हा विभाग ५० लाख तोट्यात होता. २०१३-१४ मध्ये खर्च एक कोटी पाच लाख आणि उत्पन्न ९२ लाख रुपये अशी प्रगती या विभागाने केली आहे.