बांबवडे : येथे कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर ट्रकने धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात ट्रकसह चार वाहनांचे नुकसान झाले असून, तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकने तलावाच्या वळणावर बांबवडेकडे जाणाऱ्या कमांडरला पाठीमागून धडक दिली व ट्रक बाजूपट्टीवर पलटी झाला. यामध्ये ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली नाही. ट्रकने कमांडरला धडक दिल्याने कमांडरच्या पुढे असणाऱ्या रिक्षा व आयटेन गाडीला कमांडर जाऊन धडकली. यामध्ये आयटेन गाडीतील पती-पत्नी किरकोळ जखमी झाले तर रिक्षाचालक रंगराव गणपती तळप (रा. गोगवे पैकी तळवाडी) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले.
चार वाहनांच्या या विचित्र अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद शाहुवाडी पोलिसात झालेली नव्हती.
फोटो. बांबवडे येथे अपघातात पलटी झालेला ट्रक.