शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:45 IST

वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुुरू बाळूमामांचा वार्षिक भंंडारा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी लाखो भाविकभक्तांच्या उपस्थितीत पार ...

वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुुरू बाळूमामांचा वार्षिक भंंडारा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी लाखो भाविकभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. गेले सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांच्या भक्तिमय वातावरणात, भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत, ढोल-कैताळांच्या गगनभेदी आवाजात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात श्रीक्षेत्र आदमापूर नगरी भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत भंडारमय झाली.विविध भागातील कीर्तनकार, प्रवचनकार यांची कीर्तने, प्रवचने, भजनी मंडळांची भजने, धनगरी ढोल यांच्या निनादात आणि मोठ्या भक्तीमय, उत्साही वातावरणात भंडारा उत्सव झाला. जागरादिवशी रात्री उशिरा भाविकांनी ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे बाबूराव डोणे (वाघापूरकर) यांचा चिरंजीव कृष्णात डोणे वाघापुरे यांचा भाकणुकीचा (भविष्यवाणी) कार्यक्रम झाला. धनगरी गाणी, ओव्यांच्या गायनाने भाविकभक्त तल्लीन झाला होता. उत्सवाच्या दुसºया दिवशी महाप्रसादाचा लाभ सुमारे दोन-अडीच लाख भाविकभक्तांनी घेतला.तिसºया दिवशी सद्गुरू बाळूमामांचा पालखी सोहळा बाळूमामांच्या मंदिरापासून आदमापूर गावातून सकाळी आठ वाजता सुरू झाला. धनगरी ढोलांच्या गगनभेदी निनादाबरोबरच हरीभजन, लेझीम पथके, दांडपट्टा, बाळूमामांच्या अश्वांचा ढोल-कैताळांच्या तालावरचा नयनरम्य नाच, भजन, संकीर्तन, पालखी पूजन, आरती, भंडाºयाची मुक्तहस्ते उधळण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. त्याचबरोबर मैदानी खेळांची प्रात्यक्षिके, आदीसह तरुण व आबालवृद्ध ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात रंगून गेले होते. या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पालखी सोहळ्यात दोन ते तीन क्विंटल भंडाºयाची मुक्तहस्ते उधळण करून आदमापूर नगरीने पिवळं पितांबर परिधान केले होतं.सकाळी ८ वाजता सुरू झालेला पालखी सोहळा दुपारी दोन वाजता ग्रामदैवत हनुमान देवालयाच्या पटांगणावर आला. यावेळी पालखी सोहळ्यातील भक्तांनी एकमेकांच्या अंगावर भंडाºयाची मुक्त हस्ते उधळण केली. रखरखत्या उन्हातदेखील भाविकभक्त भंडाºयाची उधळण करीत होते. बाळूमामांच्या बग्यातील सहा अश्वांचा वाद्यावरील नाच भक्तांचे आकर्षणच ठरले होते. या पालखी सोहळ्यातील सहभागी भक्तांना गावातील विविध तरुण मंडळांनी मोफत अन्नछत्राचे व ताक, सरबताचे आयोजन करून भक्तांचा आशीर्वाद घेतला. यामध्ये सद्गुरू बाळूमामा विकास फौंडेशन, बजरंग उद्योग समूह, बाळूमामा अर्थमुव्हर्स, सोनालिका ट्रॅक्टर डिलर्स व बजरंग चौकात विकास पाटील, हेमंत पाटील, गणेश खेबुडे व तरुण कार्यकर्ते यांंच्यावतीने अन्नछत्राचे वाटप करण्यात आले.सायंकाळी ५.३० वा. गावच्या आडविहिरीवर भंडारा टाकून पुन्हा बाळूमामांच्या मंदिरात पालखी सोहळा दाखल होऊन महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला. बाळूमामांच्या पालखी सोहळ्यात वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यसेवा, आदी सेवा भक्तांसाठी देवस्थान समितीकडून पुरवण्यात आल्या होत्या. या पालखी सोहळ्याचे नियोजन बाळूमामा देवस्थान समिती व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले होते. देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, भुदरगड पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, तहसीलदार, प्रांताधिकारी संपत खिलारे, पोलीस यंत्रणा, मराठा कमांडो, व्हाईट आर्मीतील रक्षक, आदमापूर गावासह आसपासच्या गावांतील सेवेकरी तरुण, महिला वर्ग यात्रेसाठी दक्ष होते.गावातील विविध तरुण मंडळांकडून पाणीपुरवठा करण्यात आला. गावच्या सरपंच नेहा पाटील, उपसरपंच बजरंग पाटील, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक व उद्योगपती दिनकरराव कांबळे, बजरंग उद्योग समूहाचे संस्थापक संभाजीराव भोसले व विविध संस्थांचे कर्मचारी, युवक यांच्या सहकार्याने पालखी सोहळा संपन्न झाला.