शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

उचगावमध्ये बगॅस डेपोला आग

By admin | Updated: April 15, 2015 00:40 IST

पावणेदोन कोटींचे नुकसान : रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरु

उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळ्यातील बगॅस डेपोला मंगळवारी भीषण आग लागून बगॅसच्या सहा गंज्या जळून खाक झाल्या. आग इतकी प्रचंड होती की, तिच्या ज्वालांमुळे परिसरातील बंगल्यांच्या काचा तडकल्या. यामध्ये सुमारे पावणेदोन कोटींचे नुकसान झाले असून, रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. मंगळवारी दुपारी बारा वाजता बगॅस डेपोला आग लागली. सात बंब, तीन पाण्याचे टँकर व पन्नासच्यावर कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आग नेमकी कोणत्या कारणांमुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. हा बगॅस डेपो कोल्हापूर डिस्टिलरी लिमिटेड यांचा असून, डी. के. कलाणी त्याचे मालक आहेत. मात्र, या बगॅसची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी त्यांनी करण एजन्सीला दिली आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास बगॅस डेपोला आग लागल्याचे परिसरातील ग्रामस्थांना समजले. त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलास याबाबत कळविले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब, जवाहर साखर कारखान्याचे दोन, कागल नगरपालिकेचे दोन, भोगावती साखर कारखान्याचा एक बंब असे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांना तीन खासगी पाण्याचे टँकर मदत करीत होते. साठ-साठ फुटी बगॅसच्या गंजी असल्याने आग विझविण्याचे काम कठीण बनत होते. टँकरवर चढून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. हे प्रयत्न जर झाले नसते, तर लगतच्या आणखी वीस बगॅस गंज्यांना आग लागली असती. मात्र, ते सुदैवाने टळले. या आगीत जीवितहानी झाली नाही. नजीकच्या शेतीमधील ऊसपीक आगीच्या ज्वालांमुळे करपून गेले. डिस्टीलरीचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनीही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी मोठी गर्दी होती. गांधीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. आग रात्रभर धुमसत राहण्याची शक्यता घटनास्थळावरील उपस्थितांतून वर्तविली जात होती. (वार्ताहर)