शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या मूळ गावातील शिल्पसृष्टीला मुहूर्तच सापडेना!

By admin | Updated: April 14, 2015 01:09 IST

बाबासाहेबांच्या मूळ गावातील शिल्पसृष्टीला मुहूर्तच सापडेना!

शिवाजी गोरे ल्ल दापोली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी या दृष्टीने बाबासाहेबांच्या मूळ गावी आंबडवे येथे पाच कोटी रुपये खर्चून शिल्पसृष्टी उभी करण्याचा निर्णय २००९ ला आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, पाच वर्षे होऊन गेली तरी शिल्पसृष्टीचे नियोजन करण्यासाठी सरकारला मुहूर्तच मिळालेला नाही. कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी २४ जून २००९ रोजी सिंधुदुर्ग येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित शिल्पसृष्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तत्कालीन ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी आंबडवे येथे भेट दिली. स्मारक व शिल्पसृष्टीसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी केली असता सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीयांनी जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशेजारील ३६ गुंठे जागा शिल्पसृष्टीसाठी नियोजित करण्यात आली. शिल्पसृष्टीच्या जागेचा तिढा सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीयांनी सोडविला. १४ मार्च २०१२ ला तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी रत्नागिरी येथे बैठक बोलावली. या बैठकीत समिती स्थापन करण्यात आली. या बैठकीला स्थानिक ग्रामस्थ हजर होते. सुदर्शन सपकाळ, नरेंद्र सपकाळ, नथुराम सपकाळ, अल्पेश सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीय या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये लवकरच कामाला सुरुवात करण्याबाबत चर्चाही झाली. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा शासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे नथुराम सपकाळ यांचे म्हणणे आहे. बाबासाहेबांच्या मूळ गावात भव्यदिव्य ग्रंथालय हवे आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची तसेच त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाची समाजातील प्रत्येक घटकाला, वाचकाला, अभ्यासकाला माहिती होण्याची गरज आहे. या ठिकाणी शिल्पसृष्टी झाल्यास येथे येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा जीवनपट कळेल. बाबासाहेबांच्या मूळगावात सद्य:स्थितीत स्मारकाशिवाय काहीही नाही. त्यामुळे येथे येऊन काय पाहावे हाच प्रश्न अनुयायांना पडला आहे. आंबडवे गाव भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे मूळ गाव असल्याने देशविदेशातील पर्यटक या गावाला भेट देण्यासाठी येऊ लागले आहेत. येथे आल्यावर त्यांचे समाधान व्हावे, बाबासाहेबांच्या नावलौकिकाला साजेसे काम व्हावे, येथे येणारा कोणताही पर्यटक निराश होणार नाही याची जबाबदारी शासनाने घेणे गरजेचे आहे. आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब यांची भावकी आंबेडकर म्हणजे आताचे सपकाळ कुटुंबीय राहतात. बाबासाहेबांबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे. बाबासाहेबांसाठी आपले सर्वस्व त्याग करायला ते तयार असतात. बाबासाहेबांच्या उपक्रमासाठी लागणारी जमीन दान देऊन त्यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. शिल्पसृष्टीसाठी ३६ गुंठे जागा देण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली; पण सरकारला मात्र या जागेवर शिल्पसृष्टी उभारण्यासाठी अजून मुहूर्त मिळालेला नाही.