शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’ निवडणुकीबाबत प्राधिकरणाला फटकारले

By admin | Updated: January 14, 2017 00:53 IST

उच्च न्यायालय : सोमवारी म्हणणे सादर करण्याचे आदेश

कोल्हापूर / भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी सहकार प्राधिकरणासह साखर सहसंचालकांना चांगलेच फटकारले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ‘अ’ वर्ग संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाच कसा? असा सवाल करीत सोमवारी (दि. १६) म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. निवडणुकीला महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. ‘भोगावती’ची निवडणूक विविध कारणांनी लांबणीवर पडली होती. जिल्हा परिषदेच्या तोंडावर निवडणूक घेऊ नये, यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील होते; पण सहकार प्राधिकरणाने गुरुवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. जिल्हा परिषद व कारखान्याचा प्रचार एकाच वेळी येणार असल्याने ते करवीर व राधानगरी तालुक्यांतील मतदारांना अडचणीचे ठरणार आहे. या विरोधात कारखान्याचे माजी संचालक विश्वनाथ पाटील, बाजार समितीचे माजी संचालक सुभाष पाटील-सिरसेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब कारंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्या. खेमकर व न्या. नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सहकार कलम ७३ (क, क) नुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरू असताना ‘अ’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक घेता येत नाही. मग सहकार प्राधिकरणाने कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाच कसा? असा सवाल करीत सोमवारी याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश न्यायालयाने सहकार विभाग, सहकार प्राधिकरण व प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले आहेत. अ‍ॅड. संजय पवार व अ‍ॅड. हर्षवर्धन भावके यांनी न्यायालयात बाजू मांडत निवडणुकीला महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली.‘शाहू’च्या निवडणुकीची आठवण!‘शाहू’- कागलच्या २००० च्या निवडणुकीत वाढीव सभासदांवर हरकत घेत हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी मतदानाच्या अगोदर एक दिवस न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती. या आठवणीला शुक्रवारी भोगावती परिसरात उजाळा दिला जात होता. ४१ उमेदवारांचे अर्जनिवडणुक कार्यक्रमाप्रमाणे मंगळवारी (दि. १७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या दिवशी ४१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये महिला, ओ.बी.सी., भटक्या विमुक्त गटाचा समावेश आहे.