शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांचे राही, तेजस्विनी, स्वरूप यांच्या कामगिरीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST

कोल्हापूर : भारतीय नेमबाजी संघ टोकियो ऑलिम्पिकनगरीत शनिवारी दाखल झाला. या संघात कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत ...

कोल्हापूर : भारतीय नेमबाजी संघ टोकियो ऑलिम्पिकनगरीत शनिवारी दाखल झाला. या संघात कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत आणि पॅरा नेमबाज स्वरूप उन्हाळकर या तिघांचा समावेश आहे. नेमबाजीचे सर्व सामने २३ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान होणार आहेत. त्यामुळे तमाम कोल्हापूरकरांचे डोळे त्यांच्या कामगिरीकडे आतापासून लागले आहेत.

टोकियो ऑलिम्पिकचे पडघम वाजू लागले आहेत. त्यात कोल्हापूरच्या तिघांचा भारतीय ऑलिम्पिक नेमबाजी संघात समावेश आहे. तिघांचाही प्रथमच ऑलिम्पिक संघात समावेश झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या पदकाच्या आशा वाढल्या आहेत. २३ जुलै ते २ ऑगस्टमध्ये राहीचा २५ मीटर पिस्तल प्रकारचा इव्हेंट २८ ते २९ आणि तेजस्विनीचा ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंट ३० जुलैला भारतीय प्रमाण ‌वेळेनुसार पहाटे ५.३० ते ९.०० वाजेपर्यंत आहे. तर पॅराऑलिम्पिक स्पर्धेतील स्वरूप उन्हाळकरचा इव्हेंट ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत होणार आहेत.

चौकट

कोल्हापूरची शान, कोल्हापूरचा अभिमान

क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, कोल्हापूरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी स्टेडियममधील क्रीडा कार्यालय, मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियम चौक, एस.एम. लोहिया हायस्कूल परिसर आदी ठिकाणी तेजस्विनी, राही आणि स्वरूप यांचे ‘कोल्हापूरची शान, कोल्हापूरचा अभिमान’ डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पाॅइंट उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

फोटो : १८०७२०२१-कोल-डिजिटल बोर्ड

ओळी : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या राही सरनोबत, तेजस्विनी सावंत आणि पॅराशूटर स्वरूप उन्हाळकर यांचा कोल्हापूरची शान, कोल्हापूरचा अभिमान म्हणून डिजिटल फलक उभारण्यात आला आहे.